सिगारेटच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ही घ्या काळजी

धुम्रपानाची सवय कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी हानिकारक आहे. आणि आजकालची तरूण पिढी देखील धुम्रपानाच्या विळख्यात ओढली जातेय. एकदा धु्म्रपानाची सवय लागली की ते व्यसन बनतं. व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय लागणे, ती सवय चांगली असू शकते किंवा वाईट देखील. व्यसन करणे म्हणजेच त्यातच आनंद माणने,पूर्णपणे त्या गोष्टीच्या होणे. प्रसंगी मुलांना आपल्या जबाबदारीची जाणीव देखील लक्षात येत नाही. मुलांना हे व्यसन लागू नये म्हणुन पालकांनी लक्ष देणे गरजेचं आहे. अशावेळी पालकांनी काय करणं गरजेचं आहे. हे जाणुन घेऊया…

मुलांना वेळ द्या आणि त्याच्यांशी चर्चा करा
घरात मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. आपल्या मुलांशी धुम्रपानाविषयी चर्चा करताना संकोच बाळगू नका. त्यांना धुम्रपानाबद्दल किती माहिती आहे ते विचारा आणि धुम्रपान करणे किती हानिकारक आहे, याची जाणीव करून द्या. मुलांशी या विषयावर चर्चा करण्यास दुर्लक्ष करू नका, धु्म्रपानाबद्दल त्यांचा दृष्टीकोन जाणून द्या.

आरोग्याविषयी माहिती द्या
बऱ्याचदा मुलांना ई-सिगारेट आणि इतर सामान्यत: वापरल्या जाणऱ्या पध्दती विषयी माहिती दिली पाहिजे. त्यांना याबाबत सावधान केलं पाहिजे. अशा कमी वयात होणाऱ्या गंभीर आजारांन विषयी बोललं पाहिजे. तसंच स्मोकिंगच्या हानिकारक समस्याबद्दल त्यांना समाजावून सांगा. त्याच प्रमाणे मुलांना स्मोकिंग झोन जवळ जाण्यापासून रोखा.

एक सिगारेट किती हानी पोहचवू शकते
मुलांना समजावून सांगा एक सिगारेट किती हानी पोहचावू शकते. एक सिगारेट तु्म्हाला धूम्रपानाचं व्यसन बनवू शकते. धूम्रपानाचे व्यसन कालांतराने सोडणे फार कठिण काम आहे.