लेदरच्या बॅग्स इतक्या महाग असतात की, त्या पुन्हा पुन्हा घेणे शक्य नसतात. पण, क्वालिटीचा विचार करून वस्तू वापरणारी महिला हमखास लेदर बॅग्सना पहिले प्राधान्य देते. आजकाल तर बऱ्याच वर्किंग वूमन्स आणि कॉलेजला जाणाऱ्या मुली लेदर बॅग वापरतात. लेदर बॅगची खासियत सांगायची झाल्यास लेदर बॅग सर्व प्रकारच्या आऊटफिटसोबत शोभून दिसतात. त्यामुळेच अनेक महिलांची या बॅग्सना अधिक पसंती असते.
प्रत्येक आऊटफिटसोबत शोभून दिसणाऱ्या लेदर बॅग्स अनेक जणी आवडीने विकत घेतात, पण त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतात. अशाने लेदर बॅग लवकर खराब होते. जर तुम्हालाही तुमची लेदर लक्झरी बॅग वर्षानुवर्षे एकदम नवीन ठेवायची असेल आणि टिकवायची असेल पुढील टिप्स नक्की फॉलो करा.
जास्त प्रमाणात सामान भरू नका – जर तुम्ही प्रमाणाच्या बाहेर लेदर बॅग्समध्ये सामान भरून ती वजनदार केल्यास ती जास्त काळ टिकू शकणार नाही. याशिवाय लेदर बॅग्समध्ये कधीच डाग लागणारी कोणती वस्तू अशीच टाकू नका. उदा, लिपस्टीक, आयशॅडो. अशा वस्तूंमुळे बॅगेत डाग पडू शकतात.
डाग पडल्यास स्वच्छ करा – तुमच्याकडून चुकून जर बॅगेवर डाग पडले असतील तर ते लगेचच स्वच्छ करा कारण तुम्ही जर ते डाग दीर्घकाळ तसेच ठेवल्यास त्या डागांचे रूपांतर जिद्दी डागांमध्ये होईल. अशाने ते डाग लवकर निघणार नाहीत. त्यामुळे बॅग वर्षानुवर्षे नवीन ठेवायची असेल तर तिची विशेष देखभाल राखा.
मोकळ्या जागेत ठेऊ नका – बंद कपाटात कधीच लेदर बॅग ठेऊ नये. अनेक जणांना अशी सवय असते की, ते बाहेरून आल्यावर बॅग कशीही आणि कुठेही टाकून देतात. असे केल्याने बॅगेवर धूळ जमा होते. तुम्ही सतत असे केल्यास बॅगेवरील धूळ वाढत जाते आणि बॅग खराब होते.
सतत धुवू नका – जर वर्षानुवर्षे लेदर बॅग टिकवायची असेल तर सतत लेदर बॅग धुणे टाळा. लेदर बॅग वारंवार धुतल्याने तिची चमक नाहीशी होते. तुम्ही लेदर बॅग अधूमधून धुवू शकता किंवा कोणता डाग पडल्यास ती जागा तुम्ही स्वच्छ करू शकता. एका कोपऱ्यात डाग पडला असेल आणि तुम्ही पूर्ण बॅग वारंवार धुवत असाल तर ते करणे टाळा. अशाने बॅग लवकर खराब होईल.
हेही पहा : Matrimonial sites चे तुम्ही होऊ शकता शिकार ?