घरलाईफस्टाईलउरलेल्या भातापासून बनवा झटपट फ्राईड राईस

उरलेल्या भातापासून बनवा झटपट फ्राईड राईस

Subscribe

चायनिज फ्राईड राईस ही जगातील एकमेव अशी डीश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. पण यासाठी प्रत्येकवेळी हॉटेलमध्ये ऑर्डर देणे गरजेचे नाही तर तुम्ही घरातही फ्राईड राईस बनवू शकता. बऱ्याचवेळा जेवणातला एखादा पदार्थ उरतो . त्यातही कधी भाजी उरते तर कधी भात उरतो. अशावेळी नेहमी फोडणीचा भात बनवण्यापेक्षा तुम्ही या उरलेल्या भातापासून फ्राईड राईसही बनवू शकता. जाणून घेऊया या फ्राईड राईसची रेसिपी.

साहीत्य- १ कप शिजवलेला भात, १ कप उभा पातळ चिरलेला कांदा, १ चमचा आलं लसूण पेस्ट, १ कप उभा चिरलेले गाजर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चिली फ्लॅक्स, अर्धा चमचा व्हिनेगर, १ चमचा चिरलेली फरसबी,  १ चमचा चिरलेला कोबी, १ चमचा टॉमेटो सॉस, चार चमचे तेल.

- Advertisement -

कृती- सर्वप्रथम एका फ्रायपॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे. नंतर त्यात कांदाआणि आलं लसून पेस्ट टाका. कांदा लालसर झाला कि त्यात गाजर, फरसबी, कोबी टाकून ३ मिनिट परता. नंतर त्यात तिखट, चिल्ली फ्लॅक्स, फ्राईड राईस मसाला , सॉस व्हिनेगर टाका. मीठ टाकून मिश्रण परता…झटपट फ्राईड राईस तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -