घरलाईफस्टाईलउरल्या सुरल्या भाज्यांचे कटलेट

उरल्या सुरल्या भाज्यांचे कटलेट

Subscribe

बऱ्याचवेळा सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणातील भाज्या उरतात. काहीजण त्या गरम करून पुन्हा खातात. तर काहीजणं फेकून देतात. पण याच उरल्या सुरल्या भाज्यांपासून टेस्टी कटलेट बनवता येतात.

साहीत्य- २ वाट्या उरलेली कुठलीही भाजी, २ उकडलेले बटाटे, एक चमचा आलं लसूण पेस्ट, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,२ कप ब्रेडचा चुरा, मीठ चवीनुसार, तेल, २ चमचे, तिखट, एक चमचा हळद, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबिर.

- Advertisement -

कृती-एका बाऊलमध्ये भाज्या, बटाटा, आलं लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबिर, तिखट, हळद, मीठ घ्या. सर्व मिश्रण एकत्र करा. तळहात पाण्याने ओला करा. त्यावर भाज्यांचे एकत्र मिश्रण कटलेटच्या आकाराने थापा. ब्रेडचा चुऱ्यात घोळवून कमी तेलात तळून घ्या. नंतर किचन पेपरवर हे कटलेट ठेवा. तेल उतरल्यावर. सॉस बरोबर खाण्यास द्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -