Tuesday, February 11, 2025
HomeमानिनीUsed Tea Powder : वापरलेली चहापावडर फेकताय? त्याआधी हे वाचा

Used Tea Powder : वापरलेली चहापावडर फेकताय? त्याआधी हे वाचा

Subscribe

गरमागरम चहाने सकाळची सुरुवात केली जाते. चहा बनवून झाल्यानंतर उरलेली चहा पावडर कचऱ्यात फेकून दिली जाते. पण, तुम्हाला हे माहित आहे का? वापरलेली चहापावडर तुम्ही पुन्हा वापरू शकता. चहापावडरचा योग्य पद्धतीने वापर केल्यास किचनमधील तुमची अनेक कामे सोपी होऊ शकतात. जसे की, स्वयंपाकघराची स्वच्छता, झाडांसाठी खत ते सौंदर्यवाढीसाठी सुद्धा चहा पावडर वापरता येते. जाणून घेऊयात, वापरलेली चहा पावडर साठवायची कशी आणि त्याचा वापर कसा करायचा,

वापरलेल्या चहा वापडरचा असा करावा वापर 

  • चहा पावडरचा वापर खत म्हणूनही करता येईल. यामुळे खत विकत आणण्यासाठी अधिक पैसे खरेदी करावे लागणार नाही.
  • चॉपिंग बोर्डचा वास दूर करण्यासाठी वाळवलेल्या चहा पावडरचा वापर करावा.
  • प्लास्टिकचे डब्बे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरलेली चहा पावडर वापरू शकता. यासाठी उरलेली चहा पावडर स्क्रबरवर घेऊन त्याने डब्बे धुवून घ्यावेत.
  • वाळलेल्या चहा पावडरने तुम्ही लाकडी फर्निचर स्वच्छ करू शकता. यासाठी वाळवलेल्या चहापावडरमध्ये पाणी घालून कापडाने लाकडी फर्निचर पुसून घ्यावे. असे केल्याने फर्निचरला नव्यासारखी चमक येते.
  • चहा पावडरमध्ये ऍटी-ऑक्सिडंट असते. चहा पावडरचा वापर जखम झाल्यास किंवा खरचटल्यास करू शकता. यामुळे जखम भरण्यास मदत होते.
  • फ्रीजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरलेल्या चहा पावडरचा वापर करता येईल. यासाठी तुम्हाला केवळ वाळवलेली चहा पावडर एका पिशवीत भरून फ्रीजच्या एका कोपऱ्यात ठेवायची आहे. या टिप्समुळे फ्रीजमधील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
  • पायपुसणी प्रत्येकाच्या घरात असते. पायपुसणीचा सतत वापर होत असल्याने कालांतराने पायपुसणीला एक प्रकारचा दुर्गध येऊ लागतो. अशावेळी पायपुसणी धुताना साबणासोबत चहा पावडरचा वापर करावा.
  • चहा पावडरने तुम्ही खिडक्यांच्या काचा किंवा काचेची भांडी स्वच्छ करू शकता.
  • उरलेली चहा पावडर तुम्ही केसांवरही लावू शकता. यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात. यासाठी जेव्हा मेहंदी केसांना लावाल तेव्हा त्यात वाळवलेली चहा पावडर टाकावी.

अशी साठवा चहा पावडर

  • सर्वात आधी चहापावडर पूर्णपणे सुकवून घ्यावी.
  • योग्य पद्धतीने चहा पावडर सुकवल्यानंतर ती स्टोअर करणे गरजेचे असते.
  • स्टोअर करण्यासाठी चहा पावडर एअर पॅक डब्यात ठेवावी आणि गरजेप्रमाणे वापरावी.

 

 

हेही पाहा –

Manini