Friday, April 19, 2024
घरमानिनीBeautyपाठ काळी पडली असेल तर लिंबूचा असा वापर करुन करा स्वच्छ

पाठ काळी पडली असेल तर लिंबूचा असा वापर करुन करा स्वच्छ

Subscribe

नेहमीच असे पाहिले जाते की, आपल्या शरिराच्या समोरील हिस्स्याची आपण व्यवस्थितीत काळजी घेतो. परंतु आपल्या शरिराचा मागील भाग स्वच्छ कसा करायचा असा प्रश्न पडतो. यामध्ये सर्वाधिक प्रमुख म्हणजे पाठ. याची स्वच्छता अनियमित करणे असो किंवा खुप वेळ उन्हाच्या संपर्कात राहिल्याने परिणामी तुमची पाठ काळी पडू शकते. असे ज्यावेळी होते तेव्हा मुलींना काही समस्यांचा सामना करावा लागतो. कारण अनअट्रॅक्टिव्ह बॅकचा अर्थ असा होतो की, असे कपडे घालता येत नाही जे पाठीमागून डीप नेकचे असतात. पण पाठ काळी पडल्यानंतर ती स्वच्छ तुम्ही करु शकता. यासाठी काही घरगुती उपाय करु शकता. (Lemon for back clean)

एलोवेरा आणि लिंबूचा रस

- Advertisement -


एका वाटाती दोन चमचे लिंबूचा रस घेऊन त्यात एक मोठा चमचा एलोवेरा जेल मिक्स करा. जर ते फ्रेश असेल तर आणखीच उत्तम. दोन्ही गोष्टी व्यवस्थितीत एकत्रित मिक्स करा आणि पाठीला लावा. एक-दोन मिनिटे तरी मसाज करा आणि लूफाच्या मदतीने स्क्रब करा. असे केल्यानंतर कोमट गरम पाण्याने ते स्वच्छ धुवा.

बेसन आणि लिंबू

- Advertisement -


प्रत्येत घरात बेसनचे पीठ असतेच. पाठीचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही बेसनचे पीठ घेऊन त्यात एका लिंबाचा रस टाका. तसेच दोन चमचे दही आणि एक चमचा गुलाब पाणी ही मिक्स करा. हे मिश्रण पाठीला लावा आणि स्क्रब करा. यानंतर 5 मिनिटे तसेच ते राहू द्या आणि स्क्रब केल्यानंततर पाठ स्वच्छ धुवा.

मसूरच्या डाळीची पावडर आणि लिंबू


एका वाटीत मसूरच्या डाळीची पावडर तीन चमचे घ्या. त्यात दोन मोठे चमचे लिंबूचा रस टाका. एक लहान चमचा एलोवेरा आणि दही टाका. सर्व गोष्टी व्यवस्थितीत मिक्स करा. थोडावेळ पाठ स्क्रब केल्यानंतर ती स्वच्छ धुवा. (Lemon for back clean)

तांदळाचे पीठ आणि लिंबू


एका वाटीत तीन चमचे तांदळाचे पीठ घ्या. यामध्ये दोन चमचे दही टाका आणि एक चमचा लिंबाचा रस. हा पॅक तुमच्या पाठीला लावा आणि 5 मिनिटांनी तो स्वच्छ धुवा.


हेही वाचा- skin care : डोळ्यांच्या डार्क सर्कलला करा बाय बाय, ‘या’ क्रीमचा करा वापर

- Advertisment -

Manini