घरलाईफस्टाईलLemon Benefits : लिंबू आहे अनेक रोगावरील रामबाण उपाय

Lemon Benefits : लिंबू आहे अनेक रोगावरील रामबाण उपाय

Subscribe

लिंबात बायोएक्टिव्हचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरासाठी उपयुक्त असते. लिंबू शरीरातील क्षार आणि पोषक तत्वांची कमतरता भरून काढते.

आपण नेहमी लिंबाचा रस पितो. लिंबू हे संत्री आणि मोसंबीसारखे साएट्रस फळ आहे. लिंबू जेवणामध्ये पदार्थाची चव वाढवण्यासाठीही वापरले जाते. लिंबूप्रमाणे लिंबूची सालही गुणकारी असते. लिंबात बायोएक्टिव्हचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरासाठी उपयुक्त असते. लिंबू शरीरातील क्षार आणि पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढते.

लिंबामध्ये पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, क्लोरिन आणि प्रथिने, चरबी हे देखील पुरेशा प्रमाणात असल्याने ते शरीराला फायदेशीर असतात. तसेच लिंबात ए, बी, आणि सी जीवनसत्त्वे खूप प्रमाणात असतात.

- Advertisement -

लिंबाचे फायदे

1. एका ग्लास पाण्यामध्ये एक लिंबू पिळून त्यात 3 चमचे साखर आणि पाव चमचा मीठ मिसळून घ्या. हे थोड थोड पाणी      प्या. असे केल्यास सारखी तहान लागणार नाही.
2. एक ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊ त्यामध्ये एक चमचा मध आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळून ते पाणी पिऊन घ्या.      यामुळे चरबी कमी होण्यासाठी मदत होते. अर्धा लिंबू घेऊन त्याच्यावर काळे मीठ टाकून चाटल्याने पचनक्रिया       सुरळीत होते आणि भूक वाढवण्यासाठी मदत होते.
3. लिंबाचा रस काढून त्याचे बारीक तुकडे करून कोमट पाण्यासोबत सेवन केल्याने पोटदुखी कमी होईल.
4. जेवल्यानंतर उलटीसारखे वाटते किंवा मळमळ्यासारख्या समस्या निर्माण होत असतील तर ताज्या लिंबाचा रस घ्या.
5. पोटातील जंत दूर करण्यासाठी लिंबाच्या पानांना बारीक करून त्याचा रस काढून ते प्या. एक चमचा रस यावेळी पुरेसा     आहे. यामुळे पोटातील जंत साफ होण्यासाठी मदत होते.
6. लघवीतील जळजळ कमी होण्यासाठी काकडीच्या रसामध्ये लिंबाच्या रसात मिसळून त्याचे सेवन केल्याने आराम       तुम्हाला आराम मिळेल.
7. मध आणि बेसनमध्ये लिंबाचा रस मिक्स करून ते चेहऱ्याला लावून घ्या. त्यामुळे डाग आणि खाज या समस्या दूर     होण्यास मदत होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -