घरलाईफस्टाईलBlue City म्हणून ओळख असलेल्या राजस्थानच्या 'या' शहराची कहाणी

Blue City म्हणून ओळख असलेल्या राजस्थानच्या ‘या’ शहराची कहाणी

Subscribe

जगभरात भारत हा विविधतेनी नटलेला असा देश आहे. जगभरात विविधतेसाठी प्रसिद्ध असलेला भारत नेहमीच आपल्या सौंदर्याने लोकांना आकर्षित करत आला आहे. आपला देश पाहण्यासाठी आणि त्याला भेट देण्यासाठी अनेक लोक येथे येतात. यात ऐतिहासिक वास्तूंपासून ते संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या शहरांपर्यंत पर्यटनाच्या दृष्टीने बरीच अशी ठिकाणी आहेत. यात भारतातील राजस्थान हे असेच एक राज्य आहे, जिथे तुम्हाला अनेक पर्यटन स्थळे आणि अनोखी संस्कृती पाहायला मिळते. येथे अशी अनेक शहरे आहेत.

 

- Advertisement -

जोधपूर हे मोठ्या शहरांपैकी एक असून जोधपूर हे शहर अंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या अवडत्या शहरांपैकी एक आहे. जोधपूरला लोक सनसिटी आणि ब्लू सिटी अशी नावे देण्यात आली आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का? जोधपूर शहराला ब्लू सिटी आणि सनसिटी ही नावे का देण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला जोधपूर शहराची गोष्टी सांगणार आहोत.

558 वर्षापूर्वी जोधपूर शहर वसले

जवळपास 558 वर्षापूर्वी जोधपूर शहराचा शोध लागला. सन 1459 साली राव जोधाने जोधपूर शहराचा शोध लावला आहे. राठोड समाजाचे प्रमुख आणि जोधपूरचे 15 वे राजा जोधा यांच्या नवावर शहराचे नाव जोधपूर असे पडले आहे. यापूर्वी जोधपूर शहराला मारवाड या नावानी ओळखले जायाचे. वाळवांटाच्या मध्य भागी बसलेले असे शहर असल्यामुळे त्याला सनसिटी हे नाव देण्यात आले आहे. तसेच जोधपूर शहरात सूर्य हा जास्त वेळ असल्यामुळे सुद्धा या शहराला सनसिटी अशी ओळख झाली आहे.

- Advertisement -

ब्लू सिटी म्हणून अशी झाली ओळख

या शहरातील बहुतांशी घरे आणि राजवाड्याना निळे रंगाच्या दगडाचा वापर केला आहे. राजस्थानमध्ये उष्णता जास्त असलेल्या शहरांपैकी एक आहे. यामुळे घराला थंड ठेवण्यासाठी निळा रंग मदत करतो आणि निळा रंग हा सूर्य प्रकाशाच्या किरणापासून सरक्षण देतो. यामुळे घरे थंड राहण्यासाठी निळा रंग मदत करतो.

भगवान शंकरसाबोत जोधपूर शहराचे हे आहे कनेक्शन

जोधपूर शहराला ब्लू सिटी हे नावामागे एक धार्मिक कथा देखील प्रचलित आहे. निळ रंग भगवान शंकराशी जोडला जातो. अशी मान्यता आहे की, विश्वाची रक्षा करण्यासाठी भगवान शंकराने हलाहल प्राशन केले. यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला. यानंतर भगवान शंकराला निळकंठ असे नाव दिले गेले. भगवान शंकराच्या भक्तीचे प्रति म्हणून लोकांनी त्यांच्या घराला निळा रंग दिला आहे.


 

हेही वाचा – टिकली लावल्यानंतर खाज येत असेल तर ‘हे’ उपाय करा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -