घरलाईफस्टाईलप्रवासादरम्यान मळमळतं, उल्टी होते आणि डोकही दुखंत? मग करा हे उपाय

प्रवासादरम्यान मळमळतं, उल्टी होते आणि डोकही दुखंत? मग करा हे उपाय

Subscribe

अनेकदा प्रवासादरम्यान लोकांना उलट्या आणि डोकेदुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या टाळण्यासाठी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत

संपूर्ण भारतात कडक उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. या परिस्थितीत उन्हाच्या छळांपासून वाचण्यासाठी अनेक जण सुट्ट्यांत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन बनवतात. यात निसर्गाच्या सानिध्यात किंवा थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिले जाते.  मात्र या पिकनिक प्लॅनिंगमध्ये  खबरदारी देखील घेणेही तितकेच गरजेचे आहे. जेणेकरून प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींमुळे तुमचा प्लॅन खराब होणार नाही. अनेकदा प्रवासादरम्यान लोकांना उलट्या आणि डोकेदुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या टाळण्यासाठी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. (lifestyle travel trips must carry these medicine trip very beneficial health)

जीडी गोयंका विद्यापीठातील स्कूल ऑफ हेल्थ अँड एलिट सायन्सचे एचओडी डॉ. प्रणव प्रकाश यांनी सांगितेल की, प्रवासादरम्यान लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत पिकनिकला जाताना डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आवश्यक औषधे सोबत घेणे महत्वाचे आहे. यात अनेकांना पिकनिकदरम्यान उलट्या आणि डोकेदुखी सामान्य समस्या आहेत. तर अनेक वेळा विमान प्रवासादरम्यान कान दुखण्याची समस्या देखील खूप त्रास देते, त्यामुळे तुमच्यासोबत काही टॉफी किंवा च्युइंगम ठेवा. ते खाल्ल्याने कानाला त्रास होत नाही.

- Advertisement -

डोकेदुखीवर घरगुती उपाय

अनेकांना प्रवासादरम्यान डोकेदुखीचा सामना करावा लागतो, ज्याची विविध कारणे असू शकतात. काहींना गाडीत बसताच डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. त्याचवेळी काही लोक आहेत ज्यांना पर्वत चढताना डोकेदुखीचा त्रास होतो. तुमच्यासोबत असे होऊ नये म्हणून तुम्ही डोकेदुखीचे औषध तुमच्यासोबत ठेवणे महत्त्वाचे आहे. डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही तुळस आणि आल्याचा रस पिणे असे अनेक घरगुती उपाय करू शकता. यामुळे वेदनांपासून आराम तर मिळेलच, पण तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंदही घेता येईल.

उलटीच्या समस्येपासून सुटका

अनेकांना प्रवासादरम्यान उलटीच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. हे मोशन सिकनेसमुळे असू शकते. हे टाळण्यासाठी पिकनिकला निघण्यापूर्वी हलके अन्न खाणे आवश्यक आहे. उलट्यांसाठी अनेक औषधे देखील उपलब्ध आहेत. याशिवाय काळी मिरी खाणे, लिंबू-मीठ चाटणे किंवा लिंबाचे लोणचे खाणे यांसारखे घरगुती उपाय करूनही उलट्यांचा त्रास टाळता येतो.

- Advertisement -

पीरियड क्रॅम्प्स

पीरियड क्रॅम्प्स ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला प्रवासात असताना खूप त्रास देऊ शकते. काही स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान पाठदुखी, पोटदुखी आणि कधीकधी ताप येतो. अशा परिस्थितीत प्रवासात तुम्ही तुमच्यासोबत गरम पाण्याची पिशवी नक्कीच घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. यात कोणत्याही ढाबा किंवा हॉटेलमधून गरम पाणी घेऊन गरम पाण्याच्या पिशव्या शेक घेऊ शकता.


उरलेल्या भातापासून बनवा झटपट फ्राईड राईस

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -