अलीकडच्या काळात मशरुम खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. हॉटेलमध्ये, पार्टीमध्ये तसेच घरी देखील अनेकजण मशरुम पासून विविध पदार्थ बनवत असतात. मशरुम केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. मशरुममध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी, बी, पोटॅशियम, फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. मात्र, मशरुम जास्त प्रमाणात खाणं देखील शरीरासाठी घातल ठरु शकतं.
मशरुम खाण्याचे फायदे
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी मशरुम खाणं फायदेशीर ठरतं. मशरुमच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
- मधुमेहाच्या सेवनाने कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो. कारण मशरुममध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. जे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करतात.
- मशरुम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील फायदेशीर आहे.
- मशरुमच्या सेवनाने हाडे निरोगी राहतात.
- मशरुम हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो तसेच कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.
मशरुम खाण्याचे तोटे
- मशरुम आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असला तरीही त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
- अनेकांना मशरुमची ऍलर्जी असते, त्यामुळे त्या व्यक्तींनी त्याचे सेवन करु नये.
- जास्त प्रमाणात मशरुमचे सेवन केल्याने पोटदुखी आणि जुलाब यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
- गरोदर महिलांनी देखील मशरुमचे सेवन करु नये.
- अनेकदा मशरुमचे सेवन केल्याने अस्वस्थ आणि थकवा जाणवू शकतो.