Friday, April 19, 2024
घरमानिनीFashionलिनेन साडीची अशी घ्या काळजी

लिनेन साडीची अशी घ्या काळजी

Subscribe

साडी नेसण्याची परंपरा आपल्याकडे फार जुनी आहे. मार्केटमध्ये कॉटन ते सिल्क साड्यांचे विविध प्रकार मिळतात. प्रत्येक साडीची एक खासियत असते. पण तुम्ही कधी लिनेनची साडी नेसली आहे का? खरंतर ही साडी सर्व महिलांसाठी एकदम बेस्ट आहे. खासकरुन उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन साडीसह लिनेनची साडी तुम्ही नेसू शकता. परंतु लिनेनची साडी नेसल्यानंतर ती स्वच्छ करताना मात्र काळजी घ्यावी लागते.

कशी धुवाल लिनेनची साडी?

- Advertisement -


-लिनेनची साडी धुण्यासाठी सर्वातप्रथम थंड पाणी आणि रॉक सॉल्ट एकत्रित करुन त्यात साडी ५-१० मिनिटे ठेवा. असे केल्याने साडीचा रंग निघणार नाही.
-आता पाण्यात माइल्ड डिटर्जेंट टाका. हवे असल्यास तुम्ही शॅम्पूचा सुद्धा वापर करु शकता.
-साडी हलक्या हाताने धुवा. अधिक जोर लावून हात धुवू नका. यामुळे तुमची साडी खराब होऊ शकते.
-साडी पाण्यातून बाहेर काढताना ती पिळू नका, तशीच ती तारेवर सुकण्यास टाका.
-लिनेनची साडी अधिक उन्हात वाळण्यासाठी टाकू नका. असे केल्याने साडीचा रंग फिका पडू शकतो.

लिनेनची साडी कशी ठेवाल?

- Advertisement -


-लिनेनची साडी तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जेथे ओलावा नसेल. तुम्ही ती साडी लाकडाच्या कपाटात किंवा न्यूजपेपरमध्ये फोल्ड करुन ठेवू शकता. साडीला मॉइश्चर पासून दूरच ठेवा.
-लिनेनची साडी वारंवार फोल्ड करु नका. असे केल्याने साडीत क्रिज येऊ शकते. अशातच साडी लवकर खराब होईल.
-साडी व्यवस्थितीत ठेवण्यासाठी तुम्ही कॉटन बॅग्सचा सुद्धा वापर करु शकता. ही बॅग तुम्ही मार्केटमधून खरेदी करु शकता.

‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या
-लिनेन साडीवर स्टार्चचा वापर अजिबात करु नका. कारण साडी कडक होईल आणि ही मऊ राहणार नाही.
-या साडीला इस्री करण्याची गरज नाही. यामध्ये क्रिज दिसून येतात आणि त्यामुळे ती विचित्र दिसते.


हेही वाचा- Womens cloth Tips : ‘या’ जीन्स वेअर केल्यावर मिळेल Comfortable आणि stylish लूक

- Advertisment -

Manini