Friday, December 13, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthLiquid Diet : हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसाठी लिक्विड डायट

Liquid Diet : हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसाठी लिक्विड डायट

Subscribe

आपली त्वचा नेहमी तजेलदार आणि चमकती दिसावी यासाठी महिला अनेक प्रकारचे उपाय करून पाहत असतात. फिटनेसकरता सध्या लिक्विड डायटचा पर्यायही ट्रेंडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. ज्यामध्ये केवळ पाणी नाही तर हर्बल ज्यूसपासून ते स्मूदीपर्यंत सर्व काही समाविष्ट असते. या लेखातून जाणून घेऊयात की प्रोसेस्ड फूड पासून पूर्णपणे आपला बचाव करणारी लिक्विड डायट आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आणि कितपत नुकसानकारक आहे.

काय आहे लिक्विड डायट ?

लिक्विड डायटमध्ये विशेषत: पाणी, ज्यूस, सूप असे पदार्थ असतात. डॉक्टर आजारपणात किंवा ऑपरेशननंतर रुग्णांना असा डायट फॉलो करण्याचा सल्ला देतात. जेणेकरुन शरीराला सहज पोषण मिळू शकेल. आणि पचनसंस्थेवर दबाव पडणार नाही. यामुळेच शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि वजनदेखील कमी होते. परंतु गरजेपेक्षा अधिक काळाकरता डायट केले गेले तर शरीराला हवी असणारी पोषकतत्त्वे मिळत नाहीत. ज्यामुळे थकवा आणि कमजोरपणा यांसोबतच अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. यासाठीच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही लिक्विड डायट फॉलो करू नये.

- Advertisement -

लिक्विड डायटचे फायदे :

लिक्विड डायट हा एक असा डायट प्रकार आहे. ज्यात अनेक द्रवपदार्थ असतात जसे की ज्यूस, सूप आणि स्मूदी. हे डायट त्याच्या अनेक फायद्यांमुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. जाणून घेऊयात याच्या फायद्यांविषयी.

जलद होणारा वेट लॉस –

- Advertisement -

लिक्विड डायटमध्ये अन्य फूड आयटम्सच्या तुलनेत कॅलरी कमी असतात. याचा अर्थ असा की तुम्ही कमी कॅलरीजचे सेवन करता ज्यामुळे तुम्हाला कमी वेळात वजन कमी करण्यासाठी मदत होते.

पचनसंस्थेला आराम –

लिक्विड पदार्थ पचवणे खूप सोपे असते. यासाठी ज्या लोकांना पचनासंबंधी समस्या आहेत किंवा ज्यांची नुकतीच सर्जरी झाली आहे. त्यांच्यासाठी लिक्विड डायट खूप फायदेशीर ठरू शकते.

बिझी लाइफस्टाइलसाठी परफेक्ट –

लिक्विड डायट तयार करणं खूप सोपं असतं. तुम्ही केवळ काही फळे , भाज्या आणि अन्य सामान एकत्र करून एक स्वादिष्ट आणि पौष्टिक शेक तयार करू शकता.

पोषकतत्त्वांनी युक्त –

जर लिक्विड डायट योग्यप्रकारे तयार केले गेले तर तुम्हाला सर्वप्रकारची पोषक तत्त्वे, व्हिटामिन्स आणि न्यूट्रिशन्स मिळू शकतात.

लिक्विड डायटला अन्य डायटसोबत मिसळूनदेखील खाल्लं जाऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये एक शेक आणि दुपारी जेवणात सूपही घेऊ शकता.

लिक्विड डायटचे नुकसान :

लिक्विड डायट हा वजन कमी करण्यासाठी एक उ्त्तम पर्याय आहे. परंतु याचे काही नुकसानदेखील आहेत.

पोषणाची कमी-

लिक्विड डायटमध्ये अनेकदा फायबर, हेल्दी फॅट आणि प्रोटीन्स असे अनेक पोषक तत्त्वं असतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात. कारण हे पचनासाठी मदत करतात. शरीराला ऊर्जा देतात.

आरोग्यावर परिणाम –

पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा , केसगळती, त्वचेशी निगडीत समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तात्पुरते परिणाम –

लिक्विड डायटमुळे दिसणारे परिणाम हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात.

मसल लॉस –

मसल लॉसमुळे कमजोरी आणि फिजिकल स्ट्रेंथमध्ये कमतरता निर्माण होते. त्यामुळे मांसपेशीमध्ये कमी कॅलरी कमी होऊ लागते.

हेही वाचा : Hair Care Tips : बदलत्या ऋतूमुळे होणारा हेअर फॉल या उपायांनी कमी करा


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini