Friday, March 21, 2025
HomeमानिनीKitchen Tips : किचनमधील या गोष्टी दिर्घकाळ वापरणे चुकीचे

Kitchen Tips : किचनमधील या गोष्टी दिर्घकाळ वापरणे चुकीचे

Subscribe

किचनमध्ये दररोज अनेक प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात. यातील काही गोष्टींची नियमित काळजी घेण्यात येते तर काही गोष्टी वर्षानुवर्ष त्याच वापरल्या जातात. पण, आरोग्याच्यादृष्टीने किचनमध्ये आपण काही गोष्टी करणे विसरतो. त्यातील एक म्हणजे शेल्फ लाइफ नसणाऱ्या गोष्टी वर्षानुवर्ष वापरणे. किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांची श्लेफ लाइफ नसते. त्यामुळे या वस्तू वेळीच बदलणे आवश्यक आहे, जेणेकरून आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आजच्या लेखात जाणून घेऊयात किचनमधील कोणत्या गोष्टी दिर्घकाळ वापरू नये.

प्लास्टिकची भांडी –

जर तुम्ही प्लास्टिकची भांडी खूप वर्ष वापरत असाल तर ही सवय आजच सोडा. आरोग्याच्यादृष्टीने प्लास्टिकच्या भांडी दर 6 महिन्यांनी बदलाव्यात. कारण दिर्घकाळ प्लास्टिकच्या वस्तू वापरल्याने त्यात लहान भेगा पडतात, ज्यामध्ये बॅक्टेरिया जमा होतात.

किचन टॉवेल, नॅपकिन –

किचनमध्ये जास्त वापर होणाऱ्या गोष्टींमध्ये किचन टॉवेल किंवा नॅपकिनचा समावेश आहे. किचनमधील टॉवेल लवकर खराब होतात आणि त्यावर बॅक्टेरिया जमा होतात. त्यामुळे या गोष्टी नियमित स्वच्छ करण्यासह वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे.

नॉन स्टिक पॅन –

नॉन स्टिक पॅन लवकर साफ होते. पण, आरोग्याच्यादृष्टीने हे योग्य नाही. कारण या पॅनवरील कोटिंग हळूहळू निघून जाते. ज्यामुळे गंभीर आजारांना निमंत्रण मिळते.

मसाले –

अनेकजण पूर्ण वर्षभरासाठी मसाले भरून ठेवतात. पण, ठराविक वेळेनंतर मसाले वापरू नयेत.

कटिंग बोर्ड –

भाजीपाला आणि फळे कापण्यासाठी कटिंग बोर्ड वापरले जाते. पण, हे चॉपिंग किंवा कटिंग बोर्ड 1 वर्षापेक्षा जास्त वापरू नये.

भांडी घासण्याचा स्पंज –

भांडी घासण्याच्या स्पंजवर सर्वात जास्त बॅक्टेरिया असतात. याशिवाय अनेक दिवस एकच स्पंज वापरल्याने त्यातून दुर्गंधी येते. त्यामुळे भांडी घासण्याचा स्पंज वेळोवेळी बदलावा.

चाकू –

किचनमधील चाकू वेळोवेळी बदलावा. बोथट चाकू, धार नसलेला चाकू वापरू नये.

नॉनस्टिक कुकवेअर –

कमी तेलात पदार्थ शिजवण्यासाठी नॉनस्टिक कुकवेअरचा वापर केला जातो. पण, नॉनस्टिक कुकवेअर आरोग्यासाठी योग्य नसतात. त्यामुळे वेळोवेळी नॉनस्टिक कुकवेअर बदलणे आवश्यक आहे.

गाळणी – 

किचनमधील चहाची गाळणी वेळोवेळी बदलावी. एकच गाळणी वर्षानुवर्ष वापरू नये.

 

 

 

 

 

हेही पाहा –

Manini