Sunday, October 1, 2023
घर मानिनी लिव्ह इन् रिलेशनशिपचे फायदे आणि तोटे

लिव्ह इन् रिलेशनशिपचे फायदे आणि तोटे

Subscribe

भारतात लिव्ह इन रिलेशनशिपचा कल्चर फार वेगाने वाढत आहे. आजकाल आपल्या घरापासून दूर राहिलेल्या मित्र अथवा पार्टनर्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे पसंद करतात. त्याचसोबत लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल खुलेआम बातचीत ही सध्या केली जाते. परंतु जसे लिव्ह इन रिलेशनशिपचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे त्याचे नुकसान सुद्धा आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपचे फायदे
-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सर्वाधिक मोठा फायदा असा असतो की, पार्टनर्स एकमेकांना उत्तपणे समजून घेऊ शकतात. दोघे ही आनंदाने राहू शकतात. त्याचसोबत जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा परिवाराच्या परवानगीने लग्न सुद्धा करु शकतात.
-या व्यतिरिक्त लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहताना तुमचे एकमेकांसोबत पटले नाही तर तुम्ही एकमेकांपासून विभक्त होऊ शकता. यासाठी त्यांना कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागत नाही.
-काही लोकांचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा असा उद्देश असतो की, लग्नापूर्वी दोन्ही पार्टनरने समजून घेतले पाहिजे.
-लिव्ह इन मध्ये राहताना एकमेकांना खासगी रुपात स्वातंत्र्य असते. त्यांच्यावर सामाजिक अथवा कायदेशीर कोणतेही बंधन नसतात.
-ज्या लोकांना लग्नाच्या बंधनात आणि कमिटमेंटमध्ये अडकायचे नसते ते सुद्धा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात.

- Advertisement -

लिव्ह इन रिलेशनशिपमुळे होणारे तोटे
-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणचे लग्न केलेच पाहिजे असे नाही.
-पार्टनर तुम्हाला कधी सोडून जाईल याची भीती मनात असते.
-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना जर मुलं जन्माला घातल्यास तर समस्या येतात. समजात अशा मुलाला स्विकार करताना विचार करतात.
-काहीवेळेस एकमेकांची वागणूक पटली नाही तर समस्या उद्भवतात आणि अशातच नात्यात फूट पडू शकते
-बहुतांश परिवार या लिव्ह इन रिलेशनशिपसाठी नकार देतात

 


- Advertisement -

हेही वाचा: गैरसमजुतीमुळे नात्यात येऊ शकतो दुरावा

- Advertisment -

Manini