Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthयकृतात समस्या उद्भवल्यास शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे

यकृतात समस्या उद्भवल्यास शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

Subscribe

आपल्या शरीरातील सर्व अवयव हे सुरळीत कार्य करावेत म्हणून त्यांना काही समस्यांपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे असते. त्यापैकीच एक म्हणजे यकृत. याच्या माध्यमातून शरीरातील काही महत्वाची कार्य पार पाडली जातात. यकृत केवळ पचनच नव्हे तर मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करत. या व्यतिरिक्त शरीरातील टॉक्सिनन्स बाहेर काढण्यासाठी यकृत मदत करतो. अशातच यकृताचे हेल्थ राखणे अत्यंत गरजेचे असते.

मात्र सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे बहुतांश लोक काही समस्यांचा सामना करतात. अशातच यकृतात बिघाड होण्याची समस्या त्यापैकी एक आहे. म्हणूनच वेळीच यकृतासंबंधित समस्यांवर उपचार केला पाहिजे. जेणेकरुन गंभीर आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. पुढील काही लक्षणांवरून तुम्ही ओळखू शकता की, यकृतात बिघाड झाला आहे.

- Advertisement -

उलटी आणि बैचेन वाटणे
काही वेळे तुम्हाला उलटी अथवा बैचेन झाल्यासारखे वाटत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की, तुमच्या यकृतात बिघाड झाला आहे. या व्यतिरिक्त रक्ताची उलटी किंवा शौचासह रक्त आल्यास तर यकृतासंबंधित समस्या आहे असे समजून जा. जर तुम्हाला ही लक्षणं दिसून आली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

पोटाला सूज येणे
क्रोनिक लिविर डिजिच्या कारणास्तव तुमच्या पोटा द्रव पदार्थ तयार होऊ शकतात. याच कारणास्तव तुमच्या पोटाचा आकार अचानक बदलल्यासारखा दिसते. पोट फुगणे, आकार वाढणे ही यकृतात बिघाड झाल्याची सुरुवातीची लक्षणे आहेत.

- Advertisement -

झोप पूर्ण न होणे
जर तुम्हाला झोपेसंदर्भात समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. खरंतर लिवर शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याचे काम करते. त्यामुळे स्लीप साइकल बिघडू शकते. लिवर सिरोसिसच्या रुग्णांना झोप पूर्ण न होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.


हेही वाचा- आहारात काळ्या मिरीचा वापर ठरेल आरोग्यकारी

- Advertisment -

Manini