Monday, January 13, 2025
HomeमानिनीLoan Settlement : लोन सेटलमेंट कशी करायची?

Loan Settlement : लोन सेटलमेंट कशी करायची?

Subscribe

आर्थिक संकटामुळे काही वेळा आपण चैनीचे छंद पूर्ण करण्यासाठी मोठी कर्जे घेतो. पण, आयुष्यात कठीण प्रसंग कधीच सांगून येत नाहीत. कठीण काळात, मासिक ईएमआय देखील भरणे कठीण होते. ईएमआय किंवा कर्ज न भरल्यास, खाजगी सावकार कोणत्या ना कोणत्या प्रकारे वसुली करतात. त्याच वेळी, बँका व्यावसायिक पद्धतीने कर्ज घेणाऱ्यांना सेटलमेंटचा पर्याय देतात.

लोन सेटलमेंट म्हणजे काय?

कर्ज सेटलमेंटमध्ये बँक आणि कर्ज घेणाऱ्या व्यक्ती यांच्यात करार झालेला असतो. या करारामध्ये, कर्ज घेणारी व्यक्ती त्याच्या थकित कर्जाची पूर्ण किंवा आंशिक रक्कम किंवा ठराविक रकमेवर सेटलमेंट करते. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा कर्जदार त्याच्या कर्जाचा EMI किंवा हप्ता फेडण्यास सक्षम नसतो.

- Advertisement -

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडून थकबाकीची रक्कम वसूल करता येत नाही आहे असे जेव्हा कर्ज देणाऱ्या संस्थेला वाटते, तेव्हा ती संस्था सेटलमेंटचा पर्याय देते. मात्र, सेटलमेंटनंतर व्यक्तीचे कर्ज पूर्णपणे बंद होत नाही. केवळ काही विशिष्ट परिस्थितींमध्ये रिकव्हरी एजंसीपासून सुटका मिळू शकते.

लोन सेटलमेंट कसे केले जाते?

लोन सेटलमेंटमध्ये, कर्ज घेतलेल्या व्यक्तीला मूळ रक्कम परत करावी लागते. मूळ रक्कम म्हणजे बँकेकडून किंवा सावकाराकडून घेतलेली रक्कम. कर्ज सेटलमेंटमध्ये, व्याज, दंड आणि इतर शुल्क अर्धे किंवा पूर्णपणे माफ केले जाऊ शकतात.

- Advertisement -

कर्ज सेटलमेंटसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. सेटलमेंटसाठी कर्ज करारापासून उत्पन्नाच्या पुराव्यापर्यंतच्या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.

ही कागदपत्रे आवश्यक :

कर्ज करार
आयडी पुरावा
उत्पन्नाचा दाखला
फायनान्शिअल स्टेटमेंट
लोन पेमेंट हिस्ट्री
हार्डशिप लेटर
कायदेशीर कागदपत्रे (लागू असल्यास)
संपर्क माहिती

Loan Settlement: How to do loan settlement?

लोन सेटलमेंटचे फायदे काय असू शकतात?

कर्जापासून मुक्तता:

कर्जाच्या तडजोडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्जापासून मुक्तता आणि त्याचे व्याज. जर तुम्ही कर्ज किंवा ईएमआयची परतफेड करू शकत नसाल तर अशा परिस्थितीत कर्ज सेटलमेंट फायदेशीर ठरू शकते.

कमी रक्कम भरणे:

लोन सेटलमेंटमध्ये कर्जाच्या रकमेपेक्षा कमी रकमेची वाटाघाटी करता येऊ शकते. अशा परिस्थितीत पैशांच्या बचतीसोबतच कर्जातून बाहेर पडण्यासही मदत होऊ शकते.

लोन सेटलमेंटचे तोटे काय आहेत?

क्रेडिट स्कोअरवर परिणाम:

लोन सेटलमेंटचा क्रेडिट स्कोअरवर सर्वात नकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा कर्जाची पूर्तता केली जाते, तेव्हा ते क्रेडिट रिपोर्टवर ‘पूर्ण रकमेपेक्षा कमी रकमेसाठी सेटल’ किंवा ‘सेटल केलेले’ असे लिहिले जाते. त्यामुळे सुमारे सात वर्षे क्रेडिट रिपोर्टवर निगेटिव्ह मार्क लागतो. खराब क्रेडिट रिपोर्ट आणि स्कोअरमुळे भविष्यात कर्ज घेणं कठीण होऊ शकते.

नातेसंबंध बिघडू शकतात:

लोन सेटलमेंट पर्याय निवडल्याने ज्याच्याकडून कर्ज घेतले आहे त्याच्याशी तुमचे नाते बिघडू शकते. यामुळे तो तुमच्यासोबत काम न करण्याचा आणि भविष्यात पैसे न देण्याचा निर्णय घेऊ शकतो.

लोन सेटलमेंटचा पर्याय निवडल्यानंतर, तुम्ही भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर, तुम्ही कर्जदाराकडे जाऊन तुमची थकबाकी परत करू शकता. असे केल्याने तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि स्कोअर सुधारू शकतो. त्यामुळे भविष्यात कर्जाची गरजही पूर्ण होऊ शकते.

हेही वाचा : Baby care Tips : मुलांना सतत डायपर घालणे सुरक्षित आहे का?


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini