घर लाईफस्टाईल लोणार सरोवराबद्दल 'या' रहस्यमय गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

लोणार सरोवराबद्दल ‘या’ रहस्यमय गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Subscribe

भारतातील काही ठिकाणे अतिशय रहस्यमय (mystery) आहेत. देशातील विविध राज्यांतील नद्या आणि तलावांशी संबंधित अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर (Lonar Lake) हे देखील त्या रहस्यमय सरोवरपैकी एक आहे. या सरोवराविषयी अशी अनेक कथा आहे की, त्याचा रंग रहस्यमयपणे रातोरात गुलाबी झाला. चला तर मग, आपण आज लोणार सरोवरबद्दल जाणून घेऊया. या सरोवरविषयीच्या 5 रहस्यमय गोष्टी  आहेत.

लोणार सरोवराबद्दल जाणून घ्या

लोणार सरोवराला लोणार क्रेटर असे नावाने ओळखतात. या सरोवरच्या निर्मितीमागे अनेक रहस्ये आहेत. या सरोवरासंदर्भात म्हणतात की, 35,000 ते 50,000 वर्षांपूर्वी येथे उल्का पडल्याने हे सरोवर तयार झाल्याचे सांगितले जाते. या सरोवराचा उल्लेख स्कंद पुराण आणि पद्म पुराण यासारख्या पुराणिक ग्रंथांमध्येही उल्लेखक करण्यात आला आहे.

- Advertisement -

सरोवरासंदर्भात अनेक रहस्ये

या सरोवराबाबत अनेक दंतकथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते. लोणासुर नावाचा एक राक्षस होता, ज्याचा वध भगवान विष्णूने केला. त्याचे रक्त परमेश्वराच्या पायाच्या बोटाला लागले होते, ते काढण्यासाठी परमेश्वराने आपला अंगठा मातीत टाकला तेव्हा तेथे खोल खड्डा तयार झाला.

कोणीही सरोवरात जात नाही

- Advertisement -

या सरोवराचे रहस्य ऐकून बरेच लोक हे पाहण्यासाठी येतात. परंतु कोणीही तलावाच्या आत जात नाही. वेळोवेळी सरोवरासंबंधीचे गूढ रहस्य उलघडण्याचा प्रयत्नही झाले आहेत, ज्याचे उत्तर आजतागायत समोर आलेले नाही.

सरोवराचा रंग गुलाबी का झाला

लोणार सरोवराचे पाणी 2 आठवड्यांनंतर गुलाबी झाले. यासंदर्भात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि पुणेस्थित आगरकर संशोधन संस्थेचे संचालक प्रशांत ढाकेफळकर म्हणतात, “आधीपासूनच खाऱ्या झालेल्या तलावातील क्षारता वाढली तरीही पाणवठे रंग बदलू लागतात.”

सरोवराजवळ अनेक मंदिरे बांधली

या सरोवराभोवती पर्वत आणि मंदिरे बांधलेली आहेत. या मंदिरांच्या यादीत एक शिवमंदिरही आहे जे खूप प्रसिद्ध आहे.


हेही वाचा – Blue City म्हणून ओळख असलेल्या राजस्थानच्या ‘या’ शहराची कहाणी

- Advertisment -