Saturday, April 20, 2024
घरमानिनीनाश्त्यासाठी नक्की ट्राय करा केळ्याची भजी

नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा केळ्याची भजी

Subscribe

दररोज नाश्त्यामध्ये कोणता नवीन पदार्थ बनवायचा असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. तुम्ही आत्तापर्यंत केळीचे वेफर्स आवडीने खाल्ले असतील, परंतु आज आम्ही तुम्हाला केळ्याची भजी कशी करायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

- Advertisement -
  • 4-5 कच्ची केळी
  • 1 वाटी बेसन पीठ
  • 1 चमचा मिरची पावडर
  • 1 चमचा गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम कच्च्या केळाचे जाडसर काप करुन घ्या.
  • आता एका भांड्यामध्ये बेसन पीठ, गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा.
  • आता केळ्याचे काप भजी प्रमाणे बेसन पीठामध्ये घाला.
  • त्यानंतर गॅसवर एक कढई तापत ठेवा आणि त्यात तेल घाला.
  • आता केळी तेलामध्ये खरपूस तळून घ्या.
  • तळून झाल्यानंतर केळी सॉससोबत सर्व्ह करा.

हेही वाचा : 

नियमित आहारात खा उकडलेले चणे; वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर

- Advertisment -

Manini