वजन कमी करण्यासाठी मन आणि तन संतुलित असणे अत्यंत गरजेचे असते. बहुतांश महिलांना लोअर बेली फॅटची समस्या असते. त्यामुळे शरीराचा आकार बिघडला जातो. काही प्रकारच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही योगा करू शकता. अशातच वेटलॉस करणार असाल तर योगा जरूर करा.
लोअर बेली फॅट कमी करण्यासाठी करा पुढील योगासने
-धनुरासन
रात्री उशिरापर्यंत काम करत बसल्याने पाय आणि खांद्यांमध्ये होणारा स्टिफनेस दूर करण्यासाठी तुम्ही धनुरासन करू शकता. हे आसन केल्याने स्नायू मजबूत होतात. त्याचसोबत पोटाच्या खालच्या हिस्स्यातील स्नायू खेचल्यासारखे होतात. जे वेटलॉससाठी फायदेशीर ठरेल.
-नौकासन
बेली फॅट कमी करण्यासाठी नौकासन करणे गरजेचे आहे. धनुरासन केल्याने बेली मसल्स संकुचित होतात. त्यामुळे फॅट बर्न होऊ लागतात. या व्यतिरिक्त पाय दुखीची समस्या ही दूर होते.
-भुजंगासन
जर तुम्हाला कंबर दुखीची समस्या असेल तर भुजंगासन करू शकता. यामुळे पाठीचा कण सरळ होतो. या व्यतिरिक्त पोट आणि पायांना होणारे दुखणे दूर होईल. हे दररोज केल्याने मानसिक शांती मिळते.
-कुंभकासन
ओटीपोटाच्या येथे जमा झालेली चरबी दूर करण्यासाठी कुंभकासन करणे गरजेचे असते. हे योगासन केल्याने ब्लड सर्कुलेशन नियमित होते. यामुळे खांदे आणि पायाचे स्नायू मजबूत होतात.
हेही वाचा- वाढलेले वजन ‘या’ एक्झरसाइजने करा कमी