Monday, January 13, 2025
HomeमानिनीLucknow Chikankari : संस्कृती जपणारी लखनऊची रॉयल चिकनकारी

Lucknow Chikankari : संस्कृती जपणारी लखनऊची रॉयल चिकनकारी

Subscribe

लखनऊचे नाव घेतले की सर्वात आधी आपल्या मनात येतो तो म्हणजे नवाब शाही महाल, वाड्या आणि तिथली राजेशाही संस्कृती. यापैकी एक आहे ती म्हणजे लखनऊची चिकनकारी. आज भारतात फॅशनचा विचार केला तर चिकनकारीचे नाव घ्यायलाच लागते. अनेक तरूणींना चिकनकारी कुर्ती आणि सूट्स घालायला आवडते. ही कला लखनऊच्या पारंपारिक भरतकाम तंत्राचा भाग आहे. आज चिकनकारी तिच्या सौंदर्य, नाजूकपणा आणि भरतकामासाठी जगभर प्रसिद्ध आहे.असं म्हटलं जातं की चिकनकारी हा लखनऊच्या संस्कृतीचा आणि वारशाचा एक भाग आहे.

त्याचा इतिहास जरी जुना असला तरी तो आजही ही शैली महिलांच्या विशेष पसंतीची आहे. जेन झी असणाऱ्या तरूणींनाही ही कला खूप आवडते. चिकनकारी त्याच्या बारीक आणि सटीक कामासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये सुती किंवा रेशमी कापडावर हाताने भरतकाम केले जाते.

- Advertisement -

आज आपण जाणून घेऊयात लखनऊच्या चिकनकारी भरतकामाच्या इतिहासाविषयी.

Lucknow Chikankari : Lucknow's Royal Chikankari that preserves culture
(Image Source : Social Media)

चिकनकारी या शब्दाची उत्पत्ती :

चिकनकारी या शब्दाची उत्पत्ती ‘चिकन’ या तुर्की शब्दापासून झाली असल्याचे सांगितले जाते. तुर्कीमध्ये, चिकन म्हणजे “नाजूक काम” किंवा “सजावट”. बुटी, पेपाणी, जाल, फुलकरी, कन्नी, आरा, तंकी आणि साबरी हे चिकनकारीचे काही प्रकार आहेत.

- Advertisement -

बेगम नूरजहाँशी जोडला आहे इतिहास :

चिकनकारीचा उगम मुघल काळात झाला. फार्सी कारागिरांनी ते भारतात आणले आणि कपड्यांवर भरतकाम करायला सुरुवात केली. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती जहांगीरची पत्नी बेगम नूरजहाँ यांच्यामुळे. असं म्हणतात की जहांगीरची पत्नी नूरजहाँ यांना हस्तकला आणि विशेषत: भरतकामाची खूप आवड होती. त्यांना स्वतःला त्यात खूप रस होता. त्यांच्या दरबारात अनेक कारागिरांना या कलेचे प्रशिक्षण दिले गेले. अशा माध्यमातून चिकनकरी लखनऊला पोहोचले.

अशी पोहोचली लखनऊमध्ये चिकनकारी :

मात्र, लखनऊपूर्वी इराणमध्ये चिकनकारीचे काम होत असे. ही कला इराणमधून भारतात पोहोचली. दिल्ली ते मुर्शिदाबाद, मुर्शिदाबाद ते ढाका आणि ढाका ते लखनऊ. आजही लखनऊ आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये स्त्रिया चिकनकारी भरतकाम करूनच घर चालवतात. आता ही कला जगभर प्रसिद्ध झाली आहे. सुरुवातीला चिकनकारी एम्ब्रॉयडरी मलमलच्या कपड्यांवर केली जायची पण काळ बदलला आणि आता कॉटनच्या कपड्यांव्यतिरिक्त ही नक्षी सिल्क, जॉर्जेट आणि शिफॉनवरही केली जाते.

काम काळजीपूर्वक केले जाते :

चिकनकारी भरतकाम करण्यासाठी कापडावर लाकडी ठोकळ्याने डिझाईन्स कोरल्या जातात . यामध्ये नीळ आणि पांढरा डाय यांचा वापर केला जातो. हे काम पूर्ण झाल्यानंतर हे कापड फ्रेममध्ये बसवून हाताने भरतकामाचे काम सुरू केले जाते. पूर्वी पांढऱ्या सुती धाग्याने भरतकाम केले जात असे. मात्र, आता सर्व रंगात भरतकाम केले जाते.

Lucknow Chikankari : Lucknow's Royal Chikankari that preserves culture
(Image Source : Social Media)

सेलिब्रिटींनाही चिकनकरीची भुरळ :

आता फॅशन डिझायनर्सनी चिकनकारीला नव्या आणि आधुनिक स्वरूपात आणले आहे. सध्याच्या तरुणांना ते खूप आवडते. चिकनकारी भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध आहे. त्याच्या सौंदर्य आणि नाजूकपणामुळे, लोक ते खरेदी करण्यास नेहमीच तयार असतात. इतकेच नाही तर सेलिब्रिटींमध्येही त्याची क्रेझ वाढली आहे. बॉलीवूडमधील अनेक प्रमुख सेलिब्रिटी चिकनकारी कपडे परिधान करताना दिसतात.

हेही वाचा : Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचे 2024 मधले लक्षवेधी लूक्स


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini