सध्या वायू प्रदूषणाचं प्रमाण फारच वाढत चाललं आहे. प्रदूषणामुळे तयार झालेल्या स्मॉगमुळे आजूबाजूच्या गोष्टीही नीट दिसणं कठीण झालं आहे. प्रदूषणाच्या चादरीमुळे लोकांना श्वास घेतानाही त्रास होत आहे. याचा दुष्परिणाम शरीरातील फुप्फुसांवर आणि शरीराच्या अन्य भागांवर पडत असतो. यासाठी वाढत्या प्रदूषणामध्ये फुप्फुसांची काळजी घेण्यासाठी लंग्ज डिटॉक्स करणं गरजेचे आहे. जाणून घेऊयात कोणत्या प्रकारे फुप्फुसांना डिटॉक्स केलं जाऊ शकतं याबद्दल.
फुप्फुसांना डिटॉक्स करण्याच्या काही टिप्स :
अँटिऑक्सिडंटस् ने युक्त पदार्थ खाण्याची सवय लावा :
फळे, भाज्या, सुका मेवा आणि बिया यांमध्ये अँटिऑक्सिडंटसचं प्रमाण अधिक असते. जे फुप्फुसांना डिटॉक्स करण्याचे काम करते.
व्हिटामिन सी :
संत्रे, लिंबू, पेरू इत्यादी फळांमध्ये व्हिटामिन सी चे प्रमाण जास्त असते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि फुप्फुसांना प्रदूषणापासूनही वाचवते.
ओमेगा 3 फॅटी अॅसिड :
मासे , अक्रोड आणि चिया सीडस् यांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस् भरपूर असतात. जे चेहऱ्याची सूज कमी करते आणि फुप्फुसांचे आरोग्य सुधारते.
योग आणि प्राणायाम :
योगासन – योगासन केल्याने शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि फुप्फुसे मजबूत होतात.
प्राणायाम – प्राणायाम केल्याने शरीरातील टॉक्सिक पदार्थ निघून जातात आणि फुप्फुसांची क्षमता वाढते.
धूम्रपान करू नका :
स्मोकिंग केल्याने फुप्फुसांना सर्वात जास्त नुकसान पोहोचतं. धूम्रपान सोडणे हा आरोग्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे.
भरपूर प्रमाणात पाणी प्या :
पाणी शरीरातील टॉक्सिक पदार्थ काढून टाकण्यात मदत करते. आणि फुप्फुसांचे आरोग्य सुधारते.
नियमित व्यायाम करा :
व्यायाम फुप्फुसांची क्षमता वाढवते. आणि शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत करते.
घरातील हवा शुद्ध ठेवा :
एयर प्युरिफायर – घरातील प्रदूषणाला नियंत्रित ठेवण्यासाठी एयर प्युरिफायरचा वापर करा. यामुळे तुम्हाला शुद्ध हवा मिळेल.
इनडोअर प्लांटस् – घरात इनडोअर प्लांटस् लावावेत. हे ऑक्सिजन हवेत सोडतात आणि प्रदूषणही कमी करतात.
हेही वाचा : Health Tips : जिरे, बडीशेप, ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे
Edited By – Tanvi Gundaye