माघी गणेश जयंती यंदा 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी श्री गणेशाची विधीपूर्वक आणि भक्तीभावाने पूजा केली तर व्यक्तीला बुद्धी, बळ, सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी लाडक्या बाप्पाला नैवेद्यात विविध पदार्थ अर्पण केले जातात. बाप्पाचा नैवेद्य म्हटलं की मोदक हमखास बनविले जातात. पण, बाप्पाला मोदंकाशिवाय अनेक पदार्थ नैवेद्यात अर्पण करता येतात. चला चर मग जाणून घेऊयात, लाडक्या बाप्पासाठी कोणकोणते पदार्थ बनवता येतील.
नारळाची करंजी –
कोकणात हमखास नारळाची करंजी बनविली जाते. करंज्या चवीला खूप छान लागतात. त्यामुळे बाप्पाला नारळाची करंजी बनवता येईल.
पुरणपोळी –
पुरणपोळी बनवण्यास थोडा वेळ लागतो. पण, नैवेद्यात चणा डाळ आणि गुळापासून तयार केलेली पुरणपोळी बनवू शकता.
मोतीचूर लाडू –
बाजारात मिळणारे मोतीचूर लाडू प्रसादात दाखवले जातात. तुम्ही हे लाडू घरी सुद्धा बनवू शकता.
श्रीखंड –
दही, साखर आणि वेलची पावडरपासून तयार होणारे श्रीखंड बाप्पाला दाखवता येईल. कमी वेळात तयार होणारा श्रीखंड पदार्थ आहे.
गोड पोळी –
तुम्ही गोड पोळी अर्थात साटोऱ्या नैवेद्यासाठी बनवू शकता.
शिरा –
गणपती बाप्पाला नैवेद्यात गोड शिऱ्याचा प्रसाद दाखवता येईल. झटपट तयार होणारा शिरा बाप्पासह अनेक जणांच्या आवडीचा असतो.
खीर –
बाप्पाला नैवेद्यात खीर अर्पण करता येतील. तांदळाची, शेवयांची किंवा फळांची खीर बनवू शकता.
रवा लाडू –
रव्याचे लाडू झटपट तयार होणारे आहेत. बाप्पाच्या नैवेद्यात तुम्हाला रव्याच्या लाडव्याचा नैवेद्य दाखवता येईल .
नारळाचा भात –
दाक्षिणात्य पदार्थ असलेला नारळाचा भात तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यात बनवू शकता.
दरम्यान, पंचांगानुसार, यंदा 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी सुरू होईल तर रविवारी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 14 मिनिटांनी समाप्त होईल. गणेश पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 36 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 40 मिनिटांपर्यत आहे. त्यानुसार, पूजेला 2 तास 2 मिनिटांचा कालावधी असणार आहे.
हेही पाहा –