Tuesday, February 11, 2025
HomeमानिनीMaharashtriyan Jewellery : प्रत्येक मुलीकडे असायलाच हवेत हे मराठमोळे दागिने

Maharashtriyan Jewellery : प्रत्येक मुलीकडे असायलाच हवेत हे मराठमोळे दागिने

Subscribe

दागिने म्हणजे मुलींचा जीव की प्राण! प्रत्येक दागिन्याची जडणघडण ही वेगवेगळी असते. त्यामुळेच प्रत्येक दागिने ही स्वतंत्र आणि वेगळी कलाकृती असते. प्रत्येक दागिन्याची एक खासियत असते. सध्या दागिन्यांची क्रेझ खूप वाढली आहे. चांदी, हिरे, मोती, असली, नकली , इमिटेशन ज्वेलरी अशा सर्वच प्रकारच्या दागिन्यांना सध्या खूप मागणी आहे.

अगदी रोज घालण्यासाठी नसले तरी काही खास प्रसंगांना घालण्यासाठी काही महत्त्वाचे दागिने हे मुलींकडे असतातच. सणसमारंभांच्या निमित्ताने तर नऊवारी लुगडी किंवा सहावारी नेसण्याकडे मुलींचा कल असतो. या पारंपरिक कपड्यांवर घालायला साजेसे दागिने प्रत्येक मुलीला हवे असतातच. यासाठीच प्रत्येक महाराष्ट्रीय मुलीकडे काही मराठमोळे दागिने हे असायलाच हवेत.

बोरमाळ :

Maharashtriyan Jewellery: Every girl must have these Marathmole jewellery
Image Source : Social Media

बोरांच्या आकारा सारखी दिसणारी मण्यांची माळ ही बोरमाळ म्हणून प्रसिद्ध आहे. बोरमाळ हा गळ्यात घालायचा दागिना आहे. सोन्याची किंवा चांदीची अशा दोन्ही प्रकारात बोरमाळ मिळते. पूर्वी बायका एक सरीची बोरमाळ घालत असत पण आता दोन किंवा त्यापेक्षा जास्त सरींची बोरमाळही बाजारात सहज उपलब्ध होऊ लागली आहे. बोरमाळ पारंपरिक जरी असली तरी ती तुम्ही ट्रेंडी कुर्ता, सलवार, मॉडर्न टॉप्स यावरदेखील परिधान करू शकता.

ठुशी :

Maharashtriyan Jewellery: Every girl must have these Marathmole jewellery
Image Source : Social Media

ठुशी हाही एक पारंपरिक दागिना आहे. तुम्ही साडी नेसत असाल किंवा नसाल तरीही तुमच्याकडे ठुशी ही असायला हवी, कारण फक्त साडी किंवा पैठणी नाही तर एखाद्या सुंदर ड्रेसवर किंवा घागरा-चोळी, अगदी डिझायनर ड्रेस वर सुद्धा ठुशी उठून दिसते. हल्लीच्या मॉडर्न स्टाईलच्या चोकरप्रमाणेच याची रचना असल्यामुळे तुम्ही ठुशीचा वापर चोकरप्रमाणेही करू शकता.

तोडे :

Maharashtriyan Jewellery: Every girl must have these Marathmole jewellery
Image Source : Social Media

तोडे म्हणजे जाड आकाराच्या बांगड्या. हिरव्या चुड्यासोबत तोडे खूपच शोभून दिसतात. तुम्हाला वेगवेगळे नक्षीकाम केलेले तोडे बाजारात सहज उपलब्ध होऊ शकतात. या दागिन्यांवर सुरेख नक्षीकाम केलेलं असतं. तोडे एका बाजूने लॉकही करता येतात.

बाजूबंद :

Maharashtriyan Jewellery: Every girl must have these Marathmole jewellery
Image Source : Social Media

स्त्रियांनी हाताच्या दंडावर घालण्याचा दागिना म्हणजे बाजूबंद. सोने, हिरे, चांदी अशा धातूंपासून बाजूबंद बनवले जातात. मोत्यांच्या बाजूबंदाला महिलांची विशेष मागणी असल्याचे पाहायला मिळते. हल्ली तर ऑक्सिडाईज मेटलपासून बनवण्यात आलेले बाजूबंद ट्रेंडी कपड्यांवर घातले जातात.

नथ :

Maharashtriyan Jewellery: Every girl must have these Marathmole jewellery
Image Source : Social Media

नथ हा एक असा दागिना आहे जी प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. पारंपरिक असला तरीही आज प्रत्येक स्त्री किंवा मुलगी नथ घालते. आजच्या काळात फक्त पारंपरिक वेशभूषा वर किंवा सणासुदीलाच नाही तर छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा, कोणत्याही वेशभूषेवर मग ती साडी असो किंवा नसो कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर नथ घातली जाते. ढोल ताशा पथका मध्ये तर पांढरा कुर्ता आणि फेट्यासोबत नथ घालणे ही एक क्रेझ बनली आहे.

हेही वाचा :  Health Tips : मानसिक आजारावर करावे हे उपाय


Edited By – Tanvi Gundaye

Manini