Tuesday, February 11, 2025
HomeमानिनीMakar Sankrant 2025 : भोगीची भाजी का खावी?

Makar Sankrant 2025 : भोगीची भाजी का खावी?

Subscribe

नवीन वर्षाचा पहिला महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांत हा सण ओळखला जातो. प्रत्येक प्रातांनुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या अदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात. यंदा हा भोगीचा सण 13 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

भोगी म्हणजे काय?

मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा. या दिवशी या सणाच्या निमित्ताने सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो. कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो.

देवाला देण्यात येणारा नैवेद्य ‘भोग’ म्हणूनही ओळखला जातो. या भोगीच्या दिवशी विशिष्ट प्रकारची भाजी तयार करण्यात येते. तिलाच भोगीची भाजी असेही म्हणतात. मराठवाड्यात या भाजीला ‘खेंगट’ म्हणतात. हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.

जानेवारी महिन्यात शेतात पीक बहरलेले असल्याने बाजारात मुबलक ताज्या भाज्या उपलब्ध असतात. मूगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी,लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते. यात फोडणीला तीळ असतातच.
बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट घालून केली जाते. भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करुन भोगीची भाजी, भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो.

थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात भाजीपाला मिळतो आणि शरीराला उर्जेचीही गरज असते. भोगीच्या भाजीकरता वांगी, हरभरे, तीळ, हिरवे वाटाणे, बाजरी असे सर्व पदार्थ वापरले जातात. तीळ स्निग्ध पदार्थ असल्यामुळे शरीराला ऊर्जा प्राप्त होते. हिरव्या वाटाण्यांमध्ये कॅल्शिअम सी भरपूर प्रमाणात असते. हरभऱ्यांमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात. तसेच
या दिवसात नैसर्गिकरित्या भूक वाढलेली असते आणि खाल्लेले अन्न शरीराला व्यवस्थित लागते, पचनही चांगले होते. म्हणूनच भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी केली जाते.

हेही वाचा : Makar Sankrant 2025 : मकर संक्रांतीला करू नयेत या चुका


Edited By – Tanvi Gundaye

Manini