आपला चेहरा नैसर्गिकरित्या सुंदर आणि ग्लोइंग दिसण्यासाठी आपण अनेक स्किकेअर रुटीन फॉलो करतो. बऱ्याचदा अनेक स्किनकेअर प्रॉडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो. या केमिकल्समुळे आपली त्वचा चांगली होण्याऐवजी खराब होते. अशावेळी तुम्ही घरीच होममेड स्क्रब बनवू शकता. बऱ्याचदा आपल्या कळत नाही कोणत्या गोष्टी आपण या स्क्रबमध्ये मिक्स करू शकतो. तर आज आपण या लेखातून जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी मिक्स करून बेस्ट होममेड स्क्रब तयार करू शकतो.
स्क्रब बनवायची सामग्री
- सोडा 1 चमचा
- ओट्स 1 चमचा
- एलोवेरा जेल 1 चमचा
स्क्रब बनवायची पद्धत
- यासाठी एका वाटीमध्ये सोडा घ्या.
- नंतर ओट्सची पावडर करून वाटीमध्ये घाला.
- नंतर त्यात कोरफडीचे जेल मिसळा.
- आता हे सर्व पदार्थ चांगले मिसळून घ्या.
- यानंतर चेहऱ्यावर लावा.
अशा प्रकारे फेस स्क्रब लावा
- या प्रकारचा स्क्रब लावण्यासाठी सर्व प्रथम तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर हा स्क्रब चेहऱ्यावर लावा.
- नंतर ते हलक्या हातांनी चेहऱ्यावर घासून घ्या.
- यानंतर ते 15 मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या.
- 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
- हे लावल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.
या प्रकारचे स्क्रब लावल्याने तुमची त्वचा सुंदर आणि चांगली राहील. तसेच हे डेड स्किन सेल्स सहजपणे काढायला मदत करते. या प्रकारचे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला जास्त गोष्टी वापरण्याची गरज नाही.परंतु जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर बेकिंग सोडा वापरण्यापूर्वी आधी तपासून घ्या.
हेही वाचा : Beauty Tips : चेहऱ्यावर फेशियल वॅक्स करणे योग्य आहे का ?
Edited By : Prachi Manjrekar