प्रत्येकजण घर सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रयत्न आणि पद्धतींचा वापर करत असतात. बऱ्याचदा वस्तू जुन्या झाल्या की आपण त्या फेकून देतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही या जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करू शकता. तुम्हाला जर गार्डनिंगची आवड असेल तर तुम्ही प्लॅन्ड स्टॅन्ड देखील तयार करू शकता. झाडे आपले घरच नाही तर घराची हवा देखील शुद्ध करायला मदत करते. आज आपण जाणून घेऊयात, जुन्या वस्तूंपासून प्लांट स्टॅंड कसे तयार करायचे.
मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि स्टाइलचे प्लांट स्टँड उपलब्ध असतात. परंतु जर तुम्हाला बजेट फ्रेंडली आणि युनिक प्लांट स्टँड हवा असेल तुम्ही, काही टाकाऊ साहित्याच्या मदतीने घरीच बनवू शकता. या होममेड प्लांट स्टँडचा फायदा हा आहे, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर सहजपणे करता येतो.
जुन्या प्लॅस्टिकच्या बाटल्या
बऱ्याचदा आपण जुन्या आणि रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या फेकून देतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? याचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. तुम्ही ते प्लांट स्टँड म्हणून देखील वापरू शकता. प्लांट स्टँड करण्यासाठी, एक मोठी प्लॅस्टिकची बॉटल घ्या, ती कात्रीने कापून घ्या. त्यानंतर त्यामध्ये या प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये झाड ठेवू शकता. तुम्ही त्या बॉटलला बाहेरून रंग देऊ शकता.
काचेची बरणी
तुम्ही काचेच्या बरणीच्या मदतीने देखील प्लांट स्टॅंड बनवू शकता. यासाठी तुम्हाला एक काचेची बरणी लागेल. त्यानंतर ती बरणी चांगली रंगवून सुकवून त्यामध्ये तुम्ही प्लांन्टेशन करू शकता. ही बरणी तुम्ही हँग देखील करू शकता.
टिफिन बॉक्स
टिफिन बॉक्स आपण बऱ्याचदा जुना झालं कि फेकून देतो तर असं न करता तुम्ही याचा पुनर्वापर देखील करू शकता. यामध्ये तुम्ही प्लांन्टेशन देखील करू शकता.
अशाप्रकारे तुम्ही जुन्या वस्तूंपासून , प्लांट स्टॅंड तयार करू शकता.
हेही वाचा : Organize Balcony Garden : बाल्कनीमधलं गार्डनिंग असं करा ऑर्गनाइज
Edited By : Prachi manjrekar