बाजारातील बनाना मफिन आपण नेहमीच खातो. पण आज आम्ही तुम्हाला घरीच बनाना मफिन कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 2 पिकलेली केळी
- 2 कप मैदा
- पाव कप दूध
- 1 चमचा बेकिंग पावडर
- 1 कप पिठीसाखर
- पाव कप लोणी किंवा तेल
- चिमूटभर मीठ
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.
- त्यानंतर दुसऱ्या भांड्यात साखर आणि लोणी चांगले फेटून घ्या.
- नंतर त्यात दूध आणि कुस्करलेली केळी घालून एकजीव करा.
- नंतर त्यात मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर घालून चांगले फेटा.
- नंतर मफिन मोल्डवर तुपाचा हात फिरवून घ्या आणि त्यात ते मिश्रण भरुन गरम केलेल्या ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 20 मिनिटे बेक करा.
- अशाप्रकारे घरच्या घरी तुम्ही ‘बनाना मफिन’ रेसिपी तयार करु शकता.
हेही वाचा :