सोप्या पद्धतीने झटपट तयार करा चिवडा

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट. दिवाळी म्हटलं कि 15 दिवस आधीच फराळाची सुरूवात होते. प्रत्येक घरात फराळ तयार करण्याची लगबग चालू असते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दिवाळीच्या पदार्थाची यादीच तयार असते. ती यादी संपता संपत नाही. बऱ्याच वेळा हे पदार्थ बनवताना वेळही कमी पडतो. तर कधी कधी पदार्थांचं प्रमाण चुकलं की पदार्थ बिघडतो. म्हणून दिवाळी फराळ्याच्या स्पेशल रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. यावर्षीही दिवाळीचा फराळ घरीच करा. चला तर पाहूया दिवाळीच्या फराळासाठी सोप्या रेसिपी आणि काही खास टिप्स.

दिवाळीत वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा तयार केला जातो. पोह्याचा चिवडा. कुरमुऱ्यांचा चिवडा, मक्याचा चिवडा बनवला जातो. यात पोह्यांचा चिवडा सर्व घरांमध्ये तयार केला जातो.

साहित्य :

 • पातळ पोहे
 • भाजलेली चणाडाळ
 • शेंगदाणे
 • सुक्या खोबऱ्याचे काप
 • हिरव्या मिरच्या
 • तेल आवश्यकतेनुसार
 • मोहरी
 • हिंग
 • हळद
 • मीठ चवीनुसार
 • साखर
 • काजू

कृती :

 • सर्वप्रथम पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
 • त्यानंतर कढईत तेल घ्या. त्यात शेंगदाणे, डाळ, काजू, सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घ्या.
 • फोडणीसाठी तेल घ्या. तेलात मोहरी, कडीपत्ता, मिरच्या, हिंग, शेंगदाणे हे सर्व साहित्य घालून व्यवस्थित ठवळून घ्या.
 • त्यात भाजलेले पोहे, डाळ, काजू, सुक्या खोबऱ्याचे काप घालून पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्या.थोडा वेळ मंद आचेवर ठेवा.
 • खमंग कुरकुरीत पोह्यांचा चिवडा तयार.

 


हेही वाचा :

घरच्या घरी तयार करा कुरकुरीत भाजणीची चकली