Wednesday, December 4, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionWinter Hair Care : हिवाळ्यात घरीच बनवा एग्जपासून कंडिशनर

Winter Hair Care : हिवाळ्यात घरीच बनवा एग्जपासून कंडिशनर

Subscribe

प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला केसांची काळजी घ्यावी लागते. परंतु हिवाळ्यात आपल्याला केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. आपल्या त्वचेसह केस देखील कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. हिवाळ्यात थंडीमुळे डोक्यामध्ये खाज येणे, केस गळणे, केस तुटणे अशा केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात हवेतील आर्द्रता आणि तापमान कमी होते. त्यामुळे स्कैल्पही ड्राई होतात. आज आपण जाऊन घेऊयात, घरीच कंडिशनर कसं बनवायचं

आजकाल कंडिशनरचे असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा आपण कंडिशनर हे बाहेरून आणतो. या कंडिशनरमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर केला जातो. ज्यामुळे आपले केस लगेच तुटतात किंवा गळतात. बऱ्याचवेळा आपल्याला घरी कंडिशनर कसे बनवायचे हे आपल्याला माहिते नसते. एग्जपासून कंडिशनर बनवायची पद्धत खालीलप्रमाणे .

- Advertisement -

एग्जपासून कंडिशनर बनवायची सामग्री

2 अंडी
1 दही
1 चमचा खोबरेल तेल
1 चमचा मध

हेअर कंडीशनर बनवायची पद्धत

  • कंडिशनर बनवण्यासाठी सर्व प्रथम एका भांड्यात अंड्यातील पिवळा भाग बाजूला काढून ठेवा.
  • यानंतर अंड्यातील बल्कमध्ये नारळ किंवा ऑलिव्ह तेल आणि दही घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
  • मिश्रण एकजीव करून चांगली पेस्ट बनवून घ्या.
  • अशाप्रकारे हेअर कंडिशनर तयार आहे.
  • हे हेअर कंडिशनर तुम्ही केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत नीट लावून घ्या.
  • अर्धा तास केसांवर राहून द्या
  • नंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या.
  • हे लावल्याने केस शायनी आणि सिल्की होतील.

केसांना अंड्याचे कंडिशनर लावण्याचे फायदे

  • केसांना अंड्याचे कंडिशनर लावण्याने केस मजबूत होतात.
  • केस मॉईशराइज होतात.
  • अंड्याचे कंडिशनर लावण्याने केस शायनी आणि सिल्की होतात.

हेअर कंडिशनर लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • जर तुम्हाला अंड्याचा वास आवडत नसेल तर तुम्ही काही थेंब लॅव्हेंडर मिसळल्याने अंड्याचा वास निघून जाईल.
  • कंडिशनर लावल्यानंतर केस नेहमी थंड किंवा साध्या पाण्याने धुवा.
  • हे कंडिशनर आठवड्यातून एकदाच वापरावे.

केसांसाठी किती फायदेशीर आहे अंडी 

अंड्यातील बल्कामध्ये प्रथिने, बायोटिन, फोलेट आणि जीवनसत्त्वे ए, डी, ई असे महत्वाचे घटक असतात. हे केस मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करतात आणि केसांना खोलवर मॉइश्चरायझ करते. त्यामुळे कोरडेपणाची समस्या दूर होते.

- Advertisement -

हेही वाचा : Winter Hair Care Tips : हिवाळ्यात स्कैल्प ड्राय होण्याची समस्या या टिप्सने कमी होईल


Edited By : Prachi Manjrekar

 

- Advertisment -

Manini