उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट. दिवाळी म्हटलं कि 15 दिवस आधीच फराळाची सुरूवात होते. प्रत्येक घरात फराळ तयार करण्याची लगबग चालू असते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दिवाळीच्या पदार्थाची यादीच तयार असते. ती यादी संपता संपत नाही. बऱ्याच वेळा हे पदार्थ बनवताना वेळही कमी पडतो. तर कधी कधी पदार्थांचं प्रमाण चुकलं की पदार्थ बिघडतो. म्हणून दिवाळी फराळ्याच्या स्पेशल रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. यावर्षीही दिवाळीचा फराळ घरीच करा. चला तर पाहूया दिवाळीच्या फराळासाठी सोप्या रेसिपी आणि काही खास टिप्स.
दिवाळीच्या फराळात बाकी काही नसले तरी चालेल पण चकली असलीच पाहिजे. लहान मुलांना अतिशय आवडणारा पदार्थ म्हणजे चकली. भाजणीच्या चकल्या आणि तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवल्या जातात.
साहित्य :
- 1 कप चकली भाजणी
- हिंग
- पांढरे तिळ
- ओवा
- लाल तिखट
- तेल
- मीठ आवश्यकतेनुसार
- चकलीचा साचा
कृती :
- सर्वप्रथम गरम पाण्यात हिंग, लाल तिखट, ओवा, तेल,पांढरे तिळ आणि मीठ घालून घ्या.
- पाणी उकळल्या नंतर गॅस बंद करा.
- नंतर त्यात चकली भाजणी घाला. ते मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवा.
- मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर कोमट पाणी टाकून पिठ मळून घ्या.
- चकलीचा साचा घ्या. त्या साच्याला आतून तेल लावा.
- त्या साच्यात मळलेल्या पिठाचा गोळा भरा आणि हव्या त्या आकाराच्या चकल्या तयार करा.
- चकल्या तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
हेही वाचा :