कढीपत्ता हा आरोग्यास उत्तम असतो. मात्र, बऱ्याचदा लहान मुले भाजी, वरण यातला कढीपत्ता काढून टाकतात. त्यामुळे जर त्यांना चमचमीत असे वडे बनवून दिल्यास ते आवडीने खातील. चला तर पाहुया कढीपत्त्याच्या वड्याची रेसिपी.
साहित्य :
- 1 वाटी भिजलेली चणाडाळ
- 1 चमचा जिरं
- 1 चमचा तिळ
- 2 हिरव्या मिरच्या
- 4 लसूण पाकळ्या
- आल्याचा तुकडा
- 1/2 वाटी कढीपत्त्याची पाने
- 1 चमचा तांदळाचे पीठ
- हळद
- कोथिंबीर
- तेल
- चवीनुसार मीठ
कृती :
- सर्वप्रथम भिजवलेली चणाडाळ, हिरव्या मिरच्या, आले, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेणे.
- त्यानंतर हे सर्व सारण एका भांड्यात काढून घेणे. तयानंतर त्यात तीळ, हळद आणि मीठ घालणे.
- तसेच काही कढपत्त्याची पाने हाताने तोडून टाकणे.
- हे सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर छोटे – छोटे वडे थापून तळून घ्या.
- घरच्या घरी गरमागरम वडे चिंचेच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.