Recipe : अंड्यापासून तयार करा चविष्ट लॉलीपॉप

तुम्हाला सुद्धा नॉनव्हेज खाण्याची आवड असेल किंवा अंडी खाण्याची आवड असेल तर कुरकुरीत अंड्याचे लॉलीपॉप नक्की ट्राय करा.

साहित्य :

 

 • 6-7 उकडलेली अंडी
 • 1 कप मैदा
 • 2 चमचे कॉर्नफ्लोर
 • 1 चमचा लाल मिरची पावडर
 • 1 चमचा हळद
 • 1 चमचा काळी मिरी पावडर
 • 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
 • 1 छोटा कांदा (बारीक चिरलेला)
 • शिमला मिरची (बारीक चिरलेली)
 • 2 चमचे चिली सॉस
 • 1 चमचा सोया सॉस
 • 1 चमचा हिरवी मिरची
 • कोथिंबीर (बारीक चिरलेली)
 • आवश्यतेनुसार पाणी

कृती :

 • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घाला.
 • त्यानंतर त्यात आलं-लसूण पेस्ट आणि पाणी घालून मिक्स करा.
 • आता उकडलेले अंडी सोलून घ्या आणि पिठात बुडवून काही मिनिटे बाजूला ठेवा.
 • आता तळण्यासाठी गॅसवर कढईत तेल गरम टाकून ते गरम करा.
 • आता त्यात मिश्रणातील अंडी घाला आणि मंद आचेवर तपकिरी होईपर्यंत तळा.
 • आता अंडी बाहेर काढून सॉस सोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe अवघ्या 15 मिनिटांमध्ये झटपट बनवा रवा डोसा