फिट मॉम बना

प्रसुती ऑपरेशनशिवाय किंवा ऑपरेशनव्दारे झाली असेल तरी मातेला १ महिना आराम आवश्यक असतो. दोन्हीही स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच व्यायामाला सुरुवात करायला हवी.

Fitness

महिला या नेहमी त्यांच्या सौंदर्याबाबत आणि शारीरिक दिसण्याबद्दल खूप सजग असतात. गरोदरपणातील वाढलेले वजन प्रसुतीनंतर कधी एकदा कमी करू असे त्यांना सतत वाटत असते. मग महिला त्यासाठी डाएटमध्ये चेंज करतात तर जास्त एक्सरसाईज करतात. पण अयोग्य खाण-पान आणि अतीशारीरिक व्यायाम मातेच्या दुध बनवण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम करतात.अर्थातच गरोदरपणात शरीरात झालेल्या बदलामुळे वाढलेले वजन आणि शरीराची ठेवण पुन्हा पूर्ववत येण्यास वेळ लागतो.त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य पद्धतींचा वापर केल्यास तुम्ही पुन्हा तुमचे शरीर मूळ स्वरुपात रुपांतरीत करू शकता.

माता बनल्यानंतर काही काळापर्यंत होर्मोन्सला सामान्य स्तरावर यायला वेळ लागतो. प्रेगनेन्सीनंतर शरीर खूप लवचिक होते. हे अशा हार्मोन्सने होते जे डिलेव्हरीमध्ये मदत करतात. याच कारणामुळे मातेच्या शरीरातील हाडांमधील कॅल्शियमचा स्तर कमी होतो. प्रसुतीनंतर महिलांच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. त्यामुळे कधी कधी महिलांच्या स्वभावात बदल होणे, राग येणे, तणाव वाढणे किंवा मुड स्विंग होणे असे प्रकार होतात.

*प्रसुती नॉर्मल झाली असेल तर साधारण १५ दिवसांनी व्यायामाला सुरुवात करावी आणि प्रसुती ऑपरेशनव्दारे झाली असेल तर १ महिन्याने सुरुवात करावी.

*फिटनेसची सुरुवात पायी चालण्याने करा. दररोज पहाटे मोकळ्या हवेत १५२० मिनिटे फेरफटका मारावा.

*घरातील छोटी छोटी कामे करायला सुरुवात करावी. पण एक लक्षात ठेवावे कुठलीही वजनदार वस्तू उचलण्याचे टाळावे.

*प्रसुतीनंतर वजन कमी करण्यासाठी सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे बाळाला जास्तीतजास्त स्तनपान करा.

स्तनपान केल्याने शरिरातील फॅट्स कमी होण्यास मदत मिळते.

*साधारणपणे हे दिसू येते की, प्रसुतीनंतर पोटाची चरबी वाढते. यासाठी काही उपयुक्त व्यायाम प्रकार केल्यास तुमच्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळेल.

* नियमीत काही हलकेफुलके एक्सरसाईजेस आणि योग्य खानपान करुनही तुम्ही तुमचे वजन कमी करु शकता.

*असे योगासने करा किंवा व्यायम करा जे तुमच्या पोटावर आणि कमरेवर ताण देतील आणि पोटावरील चरबी, कमरेचा घेर कमी करण्यास लाभदायी ठरतील.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि ती म्हणजे तुमचे वजन लवकरात लवकर कमी व्हावे यासाठी अती घाई करून खूप जास्त एक्सरसाईज करू नका. कारण ९ महिने जो बदल तुमच्या शरीरात झाला तो पूर्ववत यायला सुद्धा वेळ लागणारच. तुम्ही काय-काय एक्सरसाईज करता हे तुमचे आरोग्य आणि शारीरिक क्षमता लक्षात घेऊनच ठरवा. कारण आपल्या क्षमतेपेक्षा कधीही जास्त व्यायाम केल्यास आंतरशारीरिक दुखापत होऊ शकते.