बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला टेस्टी आणि हेल्दी ‘दुधी ठेपले’ नक्की ट्राय करू शकता.
साहित्य :
- 2 कप गव्हाचे पीठ
- 1/4 कप दुधी
- 1 चमचा दही
- 1/2 चमचा हळद
- 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- 4-5 ठेचलेल्या लसूण पाकळ्या
- 1 चमचा तेल
- चवीनुसार मीठ
- चिमूटभर साखर
कृती :
- सर्वप्रथम दुधी चांगला किसून घ्या. त्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी गाळून बाजूला काढा.
- आता किसलेल्या दुधीत गव्हाचे पीठ, दही, हळद, हिरव्या मिरच्या, लसूण, तेल, मीठ आणि हवी असल्यास साखर घालून चांगले मळून घ्या.
- त्या मळलेल्या पीठाचे समान गोळे करून घ्या. गोलाकार लाटून नॉन-स्टीक तव्यावर मंद आचेवर हे ठेपले तेल न लावताच शेकून घ्या.
- गरमगरम ठेपले तुम्ही पुदीन्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
हेही वाचा :