Receipe : घरात बनवा बाजारासारखी टेस्टी मावा कुल्फी

उन्हाळ्यात अनेकजण मावा कुल्फी खाणं पसंत करतात. त्यामुळे अनेकजण बाजारातून कुल्फी खरेदी करतात. कुल्फी खाल्ल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीला फायदा होतो. याचे दररोज मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते. दुग्धजन्य पदार्थ वापरून बनवलेल्या कुल्फीमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात.

मावा कुल्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

 • ३ मोठे चमचे मावा
 • अर्धा लीटर क्रीम दूध
 • १ लहान चमचा कॉर्नफ्लॉवर
 • २ चमचे साखर
 • अर्धा चमचा वेलची पावडर
 • पाव कप पाणी
 • १ मोठा चमचा पिस्त्याचे तुकडे
 • १ मोठा चमचा बदामाचे तुकडे

कृती :

 • एका जड भांड्यात दूध गरम करून घ्या.दूध उकळल्यानंतर मध्यम आचेवर ते १० ते १५ मिनीट आटवून घ्या.
 • त्यानंतर पाण्यामध्ये कॉनफ्लॉवर टाकून एकजीव करून घ्या. या मिश्रणाला दूधामध्ये मिक्स करून घ्या.
 • आता त्या मिश्रणामध्ये साखर, बदाम, पिस्ता, मावा आणि वेलची पावडर टाकून ५ मिनीट शिजवा,
  गॅस बंद करून या मिश्रणाला थंड होऊन द्या.
 • या मिश्रणाला कुल्फीच्या साच्यामध्ये टाकून सेट होईपर्यंत ६ तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा.
 • ६ तासानंतर फ्रीजरमधील कुल्फी सर्व करा.

 


हेही वाचा :सावधान ! कॉफी जास्त प्यायल्याने वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका