इडली सर्वांनाच आवडते. पण इडली बनवताना फार मेहनत देखील घ्यावी लागते. मात्र, जर तुम्ही मक्याची इडली बनवत असाल तर तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही.
साहित्य :
- 1 कप मक्क्याचे पीठ
- 1 कप दही
- 2 टेबल स्पून तेल
- 2-3 टेबल स्पून कोथिंबिर
- 10-12 कढीपत्याची पाने
- 1 लहान चमचा चना दाळ
- 1 लहान चमचा उडीद दाळ
- 1-2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
- 3-4 लहान चमचे ईनो
- थोडस आलं
- थोडी मोहरी
- चवी नुसार मीठ
कृती :
- Advertisement -
- सर्वातआधी तव्यावर 2 चमचे तेल टाकून गरम करा आणि मोहरीची फोडणी द्या. आता चनादाळ आणि उडिद डाळ रंग येई पर्यंत भाजून घ्या.
- त्यानंतर आलं, हिरवी मिरची आणि कढीपत्ता थोडा भाजून घ्या. आता मक्याचे पीठ थोडा वेळ भाजा.
- त्यानंतर भाजलेले मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून यामध्ये मीठ, दही आणि कोथिंबिर एकत्र करा आणि पाणी टाकून तांदळ्याच्या इडलीप्रमाणे पातळ मिश्रण बनवा.
- हे मिश्रण चांगल्या प्रकारे घोळून 10 मिनिटे ठेवून द्या. 10 मिनिटामध्ये हे मिश्रण सेट होईल.
- आता या मिश्रणामध्ये ईनो टाका आणि हे मिश्रण इडली पात्रात टाकुन द्या.
- 15 मिनिटांनंतर इडली पात्रा बाहेर काढा. अशाप्रकारे चटपटीत मक्याची झटपट इडली तयार.
हेही वाचा :