घरलाईफस्टाईलRecipe : अवघ्या 15 मिनिटांमध्ये झटपट बनवा रवा डोसा

Recipe : अवघ्या 15 मिनिटांमध्ये झटपट बनवा रवा डोसा

Subscribe

नाश्त्यामध्ये रोज रोज पोहो, उपमा हे पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर यावेळी तुम्ही रवा डोसा नक्की ट्राय करू शकता.

साहित्य :

- Advertisement -
 • 1 कप रवा
 • 1/2 कप दही
 • 1 कांदा (बारीक चिरलेला)
 • 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
 • 1 शिमला (बारीक चिरलेला)
 • 1 चमचा चाट मसाला
 • चवीनुसार मीठ
 • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

- Advertisement -
 • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये रवा, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, दही आणि थोडं पाणी टाकून घट्ट मिश्रण तयार करा.
 • या मिश्रणाला 15 मिनिट बाजूला ठेवा.
 • आता एकीकडे गॅसच्या मंद आचेवर पॅन तापत ठेवा.
 • आता त्या मिश्रणामध्ये मीठ टाका आणि एकजीव करून घ्या.
 • मिश्रणातील एक चमचा पॅन वर टाकून डोश्या प्रमाणे गोल फिरवा.
 • एक बाजू नीट भाजल्यानंतर तेल सोडून दुसरी बाजू भाजून घ्या.
 • सोनेरी रंग येईपर्यंत डोसा खरपूस भाजून घ्या.
 • अश्याच पद्धतीने सर्व डोसे भाजून घ्या आणि सॉससोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत नाचो चिप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -