मक्याचे दाणे पौष्टिक असतात. मक्याचे दाणे भाजून, उकडून आपण नेहमीच खातो. अनेकदा आपल्याकडे रात्रीचा भात उरतो. अशावेळी उरलेला भात आणि मक्यापासून कटलेट तयार करून पहा.
साहित्य :
- उरलेला भात
- उकडलेले मक्याचे दाणे
- गरम मसाला
- उकडलेला बटाटा
- लिंबाचा रस
- साखर
- ब्रेडचा चुरा
- तेल
- मीठ चवीनुसार
कृती :
- भात थोडासा मऊ हवा. जर फडफडीत भात असेल तर तो थोडा मळून किंवा कुकरला परत थोडा शिजवून घ्या.
- मक्याचे दाणे, बटाटे, भात, लिंबूरस, मीठ, साखर आणि गरम मसाला एकत्र करून छान मळून घ्या.
- आता या मिश्रणाचे छोटे गोळे करा.
- ब्रेडच्या चुऱ्यामध्ये ते घोळवून तव्यावर लालसर रंगावर तळून किंवा भाजून घ्या.
- Advertisement -
हेही वाचा :
Soyabean Chilli : अशी बनवा चटपटीत सोयाबीन चिली
- Advertisement -
- Advertisement -