लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. अशावेळी आपण सर्वचजण मोदक आवडीने बनवतो. मात्र, मोदकांव्यतिरिक्त दुसरा एखादी गोड मिठाई तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी मलई बर्फी कशी करायची ते सांगणार आहोत.
साहित्य :
- 3/4 कप दूध
- 1/2 कप साखर
- 4 चमचे तूप
- 3 कप मिल्क पावडर
- केशर
कृती :
- सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध घ्यावे. त्यानंतर त्यात अर्धा कप साखर, तूप, केशर आणि 3 कप मिल्क पावडर घालून एकजीव करुन घ्यावे.
- हे सर्व मिश्रण एकसारखे परतून घ्यावे. त्यानंतर एका ट्रेला तूप ग्रीस करुन त्यामध्ये मिश्रण घालून चांगले स्प्रेड करुन घ्यावे.
- त्यानंतर त्यावर पिस्त्याचे काप टाकावे आणि 1 तास तसेच ठेऊन द्यावे.
- नंतर त्याचे काप काढून सर्व्ह करावे. अशाप्रकारे मिल्क बर्फी तयार.
- Advertisement -
हेही वाचा :
Palak Chakali : संध्याकाळच्या भूकेसाठी बनवा पौष्टिक पालक चकली
- Advertisement -
- Advertisement -