लहान बाळांसाठी नाचणी सत्व उत्तम आहार मानला जातो. नाचणी सत्वामध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात. अनेकजण नाचणी सस्व बाजारातून आणतात. मात्र, घरच्या घरी देखील नाचणी सत्व तयार करणं खूप सोप्प आहे.
साहित्य :
- नाचणी एक वाटी
- किसलेले ओले खोबरे एक वाटी
- गूळ एक वाटी
- तूप एक चमचा
- वेलची पावडर चिमूटभर
- सुकामेवा गरजेनुसार
- मीठ चवीनुसार
- पाणी गरजेनुसार
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम नाचणी रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी आणि सकाळी नाचणी चांगली धुवून घ्यावी.
- त्यानंतर मिक्सरमध्ये नाचणी आणि ओले खोबरे वाटून घ्यावे. पातळ पेस्ट करून ते गाळणीने गाळून घ्यावे.
- या पेस्टमध्ये गूळ घालावा आणि या पेस्टमध्ये सत्व जितके पातळ करायचे आहे त्यानुसार पाणी घालावे.
- नाचणी सत्व गॅसवर मंद आंचेवर शिजू द्यावे आणि सतत ते ढवळत राहावे.नाचणी शिजल्यावर त्यात चवीपुरते मीठ टाकावे.
- आता नाचणी सत्वात सुकामेवा टाकावा.
- तयार सत्व बाळाला खाऊ घालावे.
हेही वाचा :