आरोग्य आणि सौंदर्यासाठी बीट खाणे फायदेशीर ठरते. दररोजच्या जेवणामध्ये याचा समावेश केल्याने शरिरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी मदत मिळते. त्याचप्रमाणे चेहर्यावरील स्किनच्या समस्या दुर करण्यासाठी बीट देखील उपयुक्त ठरते. बाजारात मिळणार्या लिपस्टिकमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात हे केमिकल्स ओठांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. ओठांचा रंग काळपट होणे,स्किन खराब होणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजारातील लिपस्टिक ऐवजी तुम्ही घरच्या घरी लिपस्टिक तयार करु शकता.
साहित्य :
- 1 बीट
- खोबर्याचे तेल
- मिक्सर
- गाळणी
- छोटी वाटी
कृती :
- सर्वात आधी बीट धुवून त्याचे साल काढून घ्या.त्यानंतर त्याचे छोटे-छोटे तुकडे करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्या.
- तयार झालेल्या पेस्टमध्ये पाणी टाकू नका.
- तयार पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्या.(शक्यतोवर कुढल्याही धातूची वाटी न वापरता काचेची वाटी वापरा)
- पेस्ट पूर्ण बारीक झाली आहे याची खात्री करुन घ्या.
- वाटीमध्ये काढलेल्या पेस्टमध्ये एक चमचा खोबर्याचे (नारळाचे) तेल मिसळा.
- तेल फार कमी टाकले तर लिपस्टिक ड्राय होईल त्यामुळे त्यात एक चमचा किंवा थोडे जास्त तेल मिक्स करु शकता.
- पेस्टमध्ये नारळाचे तेल मिक्स करण्यासाठी चमचा किंवा टुथपिकचा वापर करा.
- मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर फ्रिझरमध्ये ठेवा. फ्रिझरमध्ये ठेवल्यानंतर ही पेस्ट घट्ट होईल.
- पेस्ट थोडी घट्ट झाल्यानंतर एखाद्या रिकाम्या लिपबामच्या कंटेनरमध्ये भरुन पुन्हा फ्रिझरमध्ये ठेवा.त्यानंतर साधारण 2-3 तासाने तुम्ही ही लिपस्टिक वापरु शकता.