बऱ्याच जणांना उन्हाळ्यात थंडगार सेवन करावेसे वाटत असते. त्यामुळे बरेच जण ऊसाचा रस, ज्यूस, कोकम सरबत, ताक किंवा थंडगार लस्सी याचे सेवन करतात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि थकवा दूर होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला पंजाबी स्टाईल घट्ट लस्सी कशी तयार करायची हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 2 कप दही
- 1/2 कप साखर
- 1 चमचा वेलची पावडर
- 3 चमचे मलाई (मलई)
कृती :
- जाडसर घट्ट लस्सी तयार करायची असल्यास सर्वप्रथम घट्ट दही घ्या आणि त्यात पाणी न घालता घुसळा.
- 10-15 मिनिट घुसळल्यानंतर त्यात साखर घाला.
- साखर विरघळल्यानंतर त्यात वेलची पावडर घालून सर्वांना सर्व्ह करा.
- लस्सी सर्व्ह केलेल्या ग्लासमध्ये वर मलाईचा थर ठेवा.