Wednesday, April 24, 2024
घरमानिनीKitchenRagda Chaat : घरच्या घरी ट्राय करा रगडा चाट

Ragda Chaat : घरच्या घरी ट्राय करा रगडा चाट

Subscribe

बाजारात मिळणारी पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, रगडा चाट या पदार्थांचे नाव जरी घेतले. तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हे पदार्थ तुम्ही स्वताःच्या हाताने घरच्या घरी देखील बनवू शकता. आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने रगडा चाट कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत.

साहित्य :

  • 4 बटाटे
  • 3 कप पांढरे वाटाणे
  • 1 चमचा लाल मिरची पावडर
  • 1 चमचा जीरे पूड
  • कोथिंबीर
  • चाट मसाला
  • 1/2 कप शेव
  • 1 चमचा हिरवी चटणी
  • मीठ चवीनुसार

कृती :

Ragda recipe | Ragda for pani puri | How to make ragda - Rumki's Golden Spoon

- Advertisement -

 

 

  • सर्वप्रथम बटाट्याची साल काढून ते स्वच्छ करून घ्या.
  • त्यानंतर पांढरे वाटाणे स्वच्छ धूवून बटाटे आणि वाटाणे किंचीत मीठ मिक्स करून कुकरमध्ये उकडून घ्या.
  • आता बटाटे आणि वाटाणे उकडल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • आता हिरवी चटणी टाका आणि लाल तिखट आणि चाट मसाला टाका.
  • त्यावर मीठ, जीरे पूड, गाजराचा खिस, बीटाचा खीस, शेव आणि कोथिंबीर घालून सजवा.
  • गरमा गरम रगडा चाट सर्वांना खाऊ घाला.

हेही वाचा :

Receipe : टेस्टी पनीर समोसा नक्की ट्राय करा

- Advertisment -

Manini