नाचणीचा वापर आपण रोजच्या आहारात फार कमी प्रमाणात करतो. परंतु नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे 3-4 दिवसातून एकदा तरी नाचणी युक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. आज आम्ही तुम्हा नाचणीचे आप्पे कसे तयार करावे हे सांगणार आहोत.
साहित्य :
- उडीद डाळ 1 वाटी ( 4-5 तास भिजलेली)
- नाचणी पीठ 1 वाटी
- बेसन 1 वाटी
- 3-4 हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- लसूण पाकळ्या
- मीठ चवीनुसार
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम 4-5 तास भिजवलेली उडीद डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- त्यानंतर त्यात नाचणी पीठ, बेसन पीठ घालून सगळं फेटून घ्या. त्यानंतर त्यात मीठ घालून रात्रभर पीठ आंबववायला ठेवा.
- दुसऱ्या दिवशी त्या पीठात मिरची-लसूण-कोथिंबीरचे वाटण मिक्स करा.
- आप्पे पात्राच्या आतल्या बाजूस तेल लावून आप्पे घाला आणि ते दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.
- आता गरमागरम आप्पे खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्वांना सर्व्ह करा.
हेही वाचा :
Recipe: गावरान पद्धतीची मासवडी
- Advertisement -
- Advertisement -