Thursday, December 7, 2023
घरमानिनीKitchenफक्त 10 मिनिटात बनवा नाचणीचा डोसा

फक्त 10 मिनिटात बनवा नाचणीचा डोसा

Subscribe

नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला नाचणीचे बेसन डोसे कसे तयार करायचे ते सांगणार आहोत.

साहित्य : 

  • 2 वाट्या नाचणीचे पीठ
  • 1 वाटी बेसन पीठ
  • आलं-लसूण
  • मिरची पेस्ट
  • हळद
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 2 टोमॅटोची प्युरी
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती :

How to Make Multigrain Dosa for Toddlers - FirstCry Parenting

- Advertisement -
  • सर्वप्रथम नाचणीचे पीठ, बेसन पीठ, आलं-लसूण, मिरची पेस्ट, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटोची प्युरी आणि मीठ एकत्र करुन घ्यावे.
  • हे पीठ डोशाच्या पिठाएवढे पातळ करावे.
  • हे मिश्रण 1/2 तासांसाठी झाकून ठेवा.
  • त्यानंतर नॉनस्टिक पॅनवर थोडे तेल टाकून डोसे बनवावेत.
  • दोन्ही बाजूने डोसे कुरकुरीत भाजून घ्यावे.
  • हे तयार डोसे चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करावे.

 


हेही वाचा :

Recipe : बच्चेकंपनीसाठी झटपट बनवा गूळाचा पराठा

- Advertisment -

Manini