Receipe : रक्षाबंधनच्या दिवशी भावासाठी बनवा खास कलाकंद मिठाई; जाणून घ्या साहित्य आणि कृती

आपण अनेकदा सणांमध्ये घरातील देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी बाजारातून मिठाई आणतो. मात्र बाहेरच्या मिठाईपेक्षा तुम्ही घरच्या घरी तुमच्या अगदी सोप्या पद्धतीने कलाकंद मिठाई बनवू शकता.

साहित्य :

 • 2 मोठे चमचे साखर
 • 1 मोठे चमचे मिल्क पावडर
 • 1/2 चमचा वेलची पूड
 • 250 ग्रॅम पनीर
 • पिस्त्याचे तुकडे
 • गुलाबाच्या पाकळ्या

कृती :

 • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये पनीरचा बारीक चुरा करा.
 • आता एक पॅन गरम करा आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे साखर आणि पनीर टाकून 5 मिनिटापर्यंत परतून घ्या.
 • आता त्यामध्ये 1 मोठा चमचा मिल्क पावडर टाका.
 • 5-6 मिनिटानंतर या सर्व मिश्रणामध्ये वेलची पूड टाका.
 • पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या.
 • आता त्याचे बर्फी प्रमाणे बारीक काप करून पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी त्याला सजवा.
 • तयार कलाकंद सर्व्ह करा.

हेही वाचा :Receipe : श्रावणी सोमवारच्या उपवासात खा पौष्टिक मखाना बर्फी; जाणून घ्या साहित्य आणि कृती