घरलाईफस्टाईलनासलेले दूध वापरून बनवा 'हे' टेस्टी पदार्थ

नासलेले दूध वापरून बनवा ‘हे’ टेस्टी पदार्थ

Subscribe

दूध नासले की महिलांना प्रश्न पडतो की त्या दूधाचे करायचे काय? पण याच नासलेल्या दूधापासून अनेक पदार्थ बनवता येतात. नासलेल्या दूधाबरोबरच त्यातील पाण्याचा वापर करूनही अनेक पदार्थ बनवले जातात.

नासलेल्या दुधापासून प्रामुख्याने पनीर बनवले जाते. यासाठी एका स्वच्छ सफेद कपडा पातेल्यावर अंथरावा. नंतर त्यात नासलेले दूध ओतावे. दूधाचे पाणी पातेल्यात पडेल आणि त्यातील नासलेले दूध फडक्यावर राहील. नंतर त्याच फडक्यात नासलेले दूध बांधून ठेवावे. त्यातील संपूर्ण पाणी निथळून जाऊ द्यावे. पनीर तयार.

- Advertisement -

 

- Advertisement -

तर हेच दूध आटवून त्यात साखर, हिरवी वेलची टाकून गोड कलाकनही बनवता येते. अनेक घरांमध्ये खास कलाकन खाण्यासाठी दूध नासवले जाते. हे कलाकण चवीला तर अप्रतिम असते.

कणीक भिजवताना त्यात साध्या पाण्याऐवजी नासलेले पाणी वापरावे. त्या कणकेच्या पोळ्या मऊ लुसलुशीत होतात.

उपमा बनवताना त्यात साध्या पाण्याऐवजी नासलेल्या दूधाचे पाणी वापरावे. उपमा टेस्टी आणि दाणेदार होतो.

 

नासलेल्या दूधाचा वापर ज्यूस आणि सूप मध्येही करता येतो.

कुठल्याही भाजीचा रस्सा आंबटगोड बनवायचा असेल तर त्यात नासलेल्या दूधाचे पाणी टाकावे. रस्सा टेस्टी आणि चटपटीत लागतो.

भात किंवा पास्ता शिजवताना त्यात नासलेल्या दूधाचे पाणी टाकावे. भाताची, पास्त्याची चव तर बदलेलचं शिवाय त्यातून वेगळा सुंगधही येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -