Thursday, March 27, 2025
HomeमानिनीBeauty Tips : या टिप्सच्या मदतीने बनवा बेस्ट होममेड परफ्यूम

Beauty Tips : या टिप्सच्या मदतीने बनवा बेस्ट होममेड परफ्यूम

Subscribe

आपण बऱ्याचदा परफ्यूम बाहेरून आणतो. परफ्यूम हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या ब्रँडेड परफ्यूमपेक्षा नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला होममेड परफ्यूम अधिक सुरक्षित, स्वस्त आणि टिकाऊ असतो.जर तुम्हाला तुमच्या आवडीचा आणि खास सुगंध असलेला परफ्यूम बनवायचं असेल तर आज आपण जाणून घेऊयात, होममेड परफ्यूम कसं बनवायचं

जेल हर्बल परफ्यूम

जेल हर्बल परफ्यूम हे खूप काळ टिकते. जर तुम्ही हे परफ्यूम वापरले तर त्याचा सुगंध बराच काळ टिकून राहील. हे हलके मॉइश्चरायझर म्हणून देखील उत्तम काम करते.

आवश्यक साहित्य

  • १ वाटी कोरफड जेल
  • २ चमचे वाळलेल्या औषधी वनस्पती (लेमनग्रास, पुदिना किंवा दालचिनी)
  • 10-15 थेंब तेल
  • एक लहान काचेचे भांडे

परफ्यूम कसा बनवायचा

  • कोरफडीचे जेल थोडेसे गरम करा.
  • आता त्यात वाळलेल्या औषधी वनस्पती घाला आणि 30 मिनिटे तसेच राहू द्या.
  • आता औषधी वनस्पती गाळून घ्या आणि तेलांमध्ये मिसळा.
  • एका काचेच्या भांड्यात ठेवा
  • तुमच्या मनगटावर आणि मानेवर थोडेसे लावा.

ऑइल बेस हर्बल परफ्यूम

साहित्य

  • 1 ते 2 वाटी तेल (जोजोबा, बदाम किंवा नारळ तेल)
  • 2 चमचे वाळलेल्या औषधी वनस्पती (लैव्हेंडर, रोझमेरी किंवा पुदिना)
  • 10 ते 15 थेंब एसेंशियल ऑयल
  • एक लहान काचेची बाटली
  • एक डबल बॉयलर

परफ्यूम बनवायची पद्धत

  • एक डबल बॉयलरमध्ये कमी आचेवर तेल गरम करा.
  • आता त्यात वाळलेल्या औषधी वनस्पती घाला आणि त्यांना 2-3 तास ​​भिजवू द्या.
  • ते अधूनमधून ढवळत राहा.
  • औषधी वनस्पती गाळून घ्या आणि तेल एका काचेच्या बाटलीत घाला.
  • जर तुम्हाला सुगंध वाढवायचा असेल तर काही थेंब त्यामध्ये तेल घाला.

हेही वाचा : Kitchen Tips : या टिप्सच्या मदतीने घरीच बनवा कॅटरर्स सारखं जेवण


Edited By : Prachi Manjrekar

Manini