सुदृढ पचनक्रिया ही एकूणच आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते.चुकीच्या सवयी, असंतुलित आहार आणि तणाव यामुळे अपचन, गॅस, ऍसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. परंतु काही साध्या आहारातील सुधारणा केल्यास पचनसंस्थेचे आरोग्य सुधारता येते. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात पचनक्रिया सुधारण्यासाठी खाण्यात कोणते बदल करू शकतो.
फायबरयुक्त पदार्थ वाढवा
संपूर्ण धान्ये जसे की ओट्स, ब्राउन राईस, क्विनोआ हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, कोथिंबीर फळांमध्ये सफरचंद, केळी, संत्री, पपई तसेच शेंगा आणि कडधान्ये हरभरा, मूग, राजमा असे फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
प्रोबायोटिक्स आणि फर्मेंटेड पदार्थ
प्रोबायोटिक्स आणि फर्मेंटेड पदार्थ म्हणजे दही, ताक, लोणी कांजी, ढोकळा, इडली, ढोकळा लोणची आणि आंबट पदार्थ या सर्व पदार्थांचा प्रमाणात सेवन करा.
हायड्रेशनवर लक्ष द्या
दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. गरम पाणी किंवा हर्बल टी आल्याचा चहा, सौंफ पाणी
तेलकट व जड पदार्थ टाळा
तळलेले, प्रोसेस्ड आणि जंक फूड कमी खा. जास्त मसालेदार पदार्थ टाळा
नियमित आणि संतुलित आहार घ्या
दिवसातून ठराविक वेळी खा एकाच वेळी खूप जास्त न खाता, थोडे-थोडे वेळच्या अंतराने खा
जीवनशैलीत बदल करा
जेवल्यानंतर लगेच झोपू नका रोज किमान 30 मिनिटे चालण्याची किंवा हलक्या व्यायामाची सवय लावा
नारळाचे तेल आणि ऑलिव्ह तेल
जर तुम्ही वनस्पती आणि बियाण्यांचे तेल वापरत असाल तर त्याऐवजी नारळाचे तेल आणि ऑलिव्ह तेल वापरा. यामागचं कारण म्हणजे वनस्पती आणि बियाण्यांच्या तेलांमध्ये जळजळ आणि पचन समस्या उद्भवू शकतात.नारळाच्या तेलात चांगले घटक असतात, जे पचनक्रियेत मदत करतात आणि ऊर्जा प्रदान करतात.
हेही वाचा : Beauty Tips : ग्लोइंग स्किनसाठी बेस्ट डिटॉक्स ड्रिंक्स
Edited By : Prachi Manjrekar