हिरव्या मिरचीचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडतं. अनेकजण जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरचीचा आस्वाद घेतात. आत्तापर्यंत तुम्ही मिरचीचं लोणचं, मिरची भजी, मिरचीचा ठेचा खाल्लाच असेल. आज आम्ही तुम्हाला मसाला मिरची कशी बनवायची हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 250 ग्राम हिरवी मिरची
- सुके खोबरे पाव वाटी
- 10-12 लसूण पाकळ्या
- शेंगदाण्याचे कूट
- गरम मसाला
- मीठ
- तेल
- जिरे
- मोहरी
कृती :
- सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्या.
- दुसरीकडे सुके खोबर आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करा.
- बारीक झालेल्या मिश्रणामध्ये गरम मसाला, शेंगदाण्याचे कूट, मीठ घाला.
- आता सर्व मिरच्यांना सुई किंवा सुरीने मध्यभागी चीरा करा. या चीरांमध्ये तयार मसाला घाला.
- आता कढईत तेल टाकून त्यात जिरे, मोहरी घालून परता.
- आता त्यात मिरची मसाला घालून परता.
- 10-15 मिनिटांसाठी त्यावर झाकण घालून ठेवा.
- आता पुन्हा एकदा मिरची मसाला परतून गॅस बंद करा.
- तयार मिरची मसाला भाकरीसोबत सर्व्ह करा.
हेही वाचा :
Recipe : चमचमीत ढोबळी मिरचीचं रायतं
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -